कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून गेल्या २४ तासात २,२१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ हजार ६५९ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. निगेटिव्ह  ९,५१८ इतके आहेत.

पॉझिटीव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – कोल्हापूर शहरातील ५४६, आजरा तालुक्यातील ३२, भुदरगड तालुक्यातील ५३, चंदगड तालुक्यातील ३९, गडहिंग्लज तालुक्यातील ९३, गगनबावडा तालुक्यातील ५, हातकणंगले तालुक्यातील ३७४, कागल तालुक्यातील ६०, करवीर तालुक्यातील २९८, पन्हाळा तालुक्यातील १३९ , राधानगरी तालुक्यातील ३७, शाहूवाडी तालुक्यातील ५६, शिरोळ तालुक्यातील १७६, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १९० आणि इतर जिल्ह्यातील १२१

आजवर एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या १ लाख ९ हजार ५९१इतकी झाली आहे. तर ९०,६८६ डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजमितीस उपचारासाठी१५,२७० रुग्ण दाखल आहेत. तर एकूण ३,६३५ मृत्यू झाले आहेत.