मुंबई/प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेस नाराज आहे. मुंबईतील आणि सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. यामध्ये मुंबई कॉग्रेस विरुद्ध परदेश कॉंग्रेस असा वाद सुरु झाला आहे. यात मुंबईतील काँग्रेसला हव्या असलेल्या जागा ठाकरेंच्या सेनेने घेतल्या. त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज झाल्या आहेत. अखेर वर्षा गायकवाड यांनी यावर भाष्य करत नाना पटोले यांचे नाव न घेता परखड टीका केली आहे.

मुबईमधील जागा वाटपावरून कॉंग्रेस नेत्या वर्ष गायकवाड नाराज आहेत. त्यांनी उघड नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला काही जागांवर तडजोड करावी लागली. तसेच जागा वाटप करतना कॉंग्रेस नेतांनी आपल्याभूमिकेव्र ठाम राहायला हवं होतं, असं म्हणत अप्रत्यक्ष नाना पतिले यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, मुंबईत वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मी माझं मत पक्षश्रेष्ठींकडे सांगितलं आहे. बैठकांमध्येही सांगितलं. त्याचबरोबर पत्र लिहूनही कळवलं आहे. मी सातत्याने महाराष्ट्रातील नेते, दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भावना सांगितल्या होत्या.”

त्या पुढे म्हणाल्या की, “माझी हीच अपेक्षा होती की, जागावाटपात आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत. भलेही आमचे काही नेते गेले असले, तरी पक्ष संघटना आमची मुंबईमध्ये मजबूत आहे. आम्हाला ही अपेक्षा होती की कमीत कमी तीन किंवा दोन जागा मिळाव्यात. आम्ही बरोबरीत आहोत.”

पक्षाचा निर्णय स्वीकारला -वर्षा गायकवाड
“आम्ही आमच्या पक्षाला सांगितलं. आमच्या पक्षाने भूमिका घेतली आहे. पक्षाने एकदा भूमिका घेतल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. येणाऱ्या काळात आम्ही कामाला लागू. आमचं काहीही म्हणणं असलं, तर पक्षश्रेष्ठीला कळवू”, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.

“मुंबईचं वेगळं अस्तित्व आहे. मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना कुठे ना कुठे आम्हाला अपेक्षा होती की, पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आमची भूमिका अशी की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काही बाबतीत कठोर भूमिका घ्यायला हवी होती. आपली भूमिका मांडायला पाहिजे होती”, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला.

“देशाचं संविधान आणि लोकशाही टिकलं पाहिजे. त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. आम्ही कामाला लागू. प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागू. खूप चर्चा करून ही यादी जाहीर केलेली आहे. आघाडी असताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात”, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.

“मी प्रत्येक बैठकीला उपस्थित होते. आम्ही मुंबईबद्दलची आमची भूमिका सांगितली होती. कोणत्या जागा हव्या आहेत. पहिल्या दिवसांपासून आमची भूमिका बदललेली नाही. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई किंवा उत्तर पश्चिम मुंबईबद्दलही भूमिका मांडलेली आहे”, असे त्या म्हणाल्या.

“शेवटी आमचं म्हणणं एकच होतं की, निकष काय असला पाहिजे. जिंकणं हाच निकष असला पाहिजे. जिंकण्यासाठी जो उमेदवारी योग्य आहे, त्याला तिथे तिकीट दिलं पाहिजे. हीच आमची सातत्याने भूमिका आहे. शेवटी आम्ही पक्षशिस्त पाळतो. ज्या गोष्टी झाल्यात त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही”, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी प्रचाराला सुरूवात करणार आहोत असे सांगित