कळे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमधील उच्च माध्यमिक विभागाचे सहायक शिक्षक आणि कवी प्रकाश पाटील (चिंचवडे, ता. करवीर) यांच्या ‘अंधार वाटेवर’ या काव्यसंग्रहास नुकताच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसुल सोलापुरे (बहुउद्देशीय संस्था,  महागाव) यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मरळी (ता. पन्हाळा) यांच्यातर्फे संस्थेचे कार्याध्यक्ष पी. व्ही. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्था सचिव संभाजी दांगट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्था अध्यक्ष रामचंद्र बच्चे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष बाजीराव वरपे,  सदस्य आनंदराव पाटील (म्हाळुंगे), एस. एम. पाटील,  मारुती सावंत,  शरद दंताळ, सुरेश नाईक, रंगराव शिखरे,  साताप्पा परितकर, संजय मोरे (मोरेवाडी), एल. डी. पोवार, ए. के. पाटील, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील (कुडित्रेकर) प्रकाश पाटील (कुडित्रे), महादेव पाटील (वाकरे) आदी उपस्थित होते.