कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘लाईव्ह मराठी’ने आज (रविवार) राजाराम बंधाऱ्यात चारचाकी गाडी कोसळ्याचे वृत्त प्रसारीत केले होते. या बातमीची दखल घेत आ. ऋतुराज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, मी स्वतः राजाराम बंधाऱ्याबाबत इरिगेशन विभाग अधिकाऱ्यांशी बोललो आहे. तसेच या पुलावरील खड्डे लवकर मुजवण्या बाबत सुचना दिल्या आहेत. तसेच केएमसीचे उपअभियंता हर्षजित घाटगे यांना तात्काळ सर्च लाईट लावण्यासाठी सांगितले आहे. तसे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.