कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आज (शुक्रवार) राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. हेमांगी जगदीश निकम (वय २१, रा. त्रिवेणी संकुल शाहू पार्क, राजेंद्रनगर) असे तिचे नाव आहे. याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्रनगर येथील शाहूपार्कमध्ये हेमांगी निकम आपल्या ती आपल्या आई-वडिलांसह राहत होती. ती एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासाच्या तणावामुळे हेमांगिनी निकम हिने आज दुपारी राहत्या घरातील फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आला.
त्यानंतर या घटनेची माहिती राजारामपूरी पोलिसांना कळवली. यावेळी पोलीस हावलदार विजय भिवटे, गौतम कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयाकडे पाठवला.