कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेचा १०४ वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशन,  वृक्षप्रेमी संस्था,  स्वच्छता दूत अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार,  महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. ही मोहीम  महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

स्वच्छता मोहीम नेहरुनगर,  काशिद कॉलनी सम्राटनगर,  केएमटी वर्कशॉप शास्त्रीनगर, सर्किट हॉऊस ते लाईन बाजार,  तलवार चौक ते संभाजीनगर मेन रोड येथे करण्यात आली.

स्वच्छता मोहीम स्वरा फौंडेशनच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन परिसराची स्वच्छता करुन झाडांना पाणी दिले. यावेळी शाखा अभियंता आर. के. पाटील,  स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, उपाध्यक्ष अमृता वासकर,  डॉ. अविनाश शिंदे,  आयुष शिंदे आदी उपस्थित होते.  मोहिमेमध्ये वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, सचिन पवार, संदीप देसाई, परितोष उरकुडे, तात्या गोवा वाला, प्रमोद गुरव, विकास कोंडेकर व सदस्य उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेत ३ जेसीबी,  ५ डंपर, ३ आरसी गाडया,  २ ट्रॅक्टर ट्रॉली, ४ औषध फवारणीचा वापर  करण्यात  आला.  तसेच  ही मोहीम महापालिकेच्या ६०  स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबविण्यात आली.  यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर,  निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, नंदकुमान पाटील,  करण लाटवडे  आदीसह  कर्मचारी उपस्थित होते.