कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या विकासकामाला गती मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. थेट पाईपलाईन, अमृत योजनांसह शहरात सुरू असलेल्या विविध योजनेच्या कामाला गती दिली आहे. यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाचे नियोजन केले जात आहे. विकास कामे दर्जेदार व्हावीत, याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, याकडे भागातील नागरिकांनीही लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.

साई एक्सटेंशन प्रभागातील रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार स्थानिक विकास निधीतून राजारामपुरी तिसरी गल्ली येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार जाधव यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला आणि विकासकामांबद्दल नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, दुर्गेश लिंग्रज, अनिल घाटगे, अनुप पाटील, विनायक सुर्यवंशी, अनिल कदम, जयेश ओसवाल, कमलाकर जगदाळे, काका जाधव, डॉ. निता पिलाई, प्रदीप काटे, हणमंत पोवार, हेमंत मोसल, किरण पोवार, अमित पोवार, अवधूत आरगे, सुनिल भोसले, अविनाश माळी आदी उपस्थित होते.