शिरोळ (प्रतिनिधी) : लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे तसेच बाहेरील तेलकट पदार्थच आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. तसेच लहान मुलांना टीव्ही आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी केले. ते शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिरावेळी बोलत होते.

यावेळी नांदणी ग्रामपंचायत, कोपिअस हेल्थकेअर, रोटरी कलब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी आणि विद्यमान डॉक्टर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ० ते १६ वर्षे वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी सरपंच संगीता तगारे, नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. शर्वरी इंगळे, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे संजय शिंदे, चंद्रकांत भाट, राजीव कुचकर सुनील क्षिरसागर अमोल पाटील, मीनाक्षी सुतार, सुमित पाटील, राकेश लांबे, प्राजक्ता कुरणे आदी उपस्थित होते.