नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारने गेल्या सहा वर्षांत सहा लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात यशस्वी ठरले आहे. असा दावा केला आहे. लोक भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने निवडलेल्या होमिओपॅथिक फार्मासिस्टना नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी ही माहिती दिली.


यावेळी बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात लोकसेवा आयोगाचे निकाल लागण्यासाठी पूर्वी दीड ते दोन वर्षे लागायची, पण आता अधीनस्थ सेवा निवड आयोग सहा ते नऊ महिन्यांत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निकाल देत आहे. आपल्या सरकारच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सहा लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“आपण एकत्र येऊन उत्तर प्रदेशला सक्षम आणि समृद्ध राज्य बनवू.” ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे राज्यात ३८ लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. यामुळे एक कोटीहून अधिक तरुणांना रोजगार मिळेल असे ही ते यावेळी म्हणाले. मात्र योगींच्या या विधानाची उलट सुलट चर्चा आता सुरु झाली आहे.