पुणे – सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या प्रचारादरम्यान महायुतीतील दोन बडे नेते एकत्र आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील हे दोघे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. फक्त एकत्रच नाही आले तर छान पैकी मिसळवर ताव ही मारल्याचे पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांच्यात बिनसले असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरु झाला होता . पुण्याचे पालकमंत्री पद हे चंद्रकांत दादा पाटील याना हवे होते. परंतु ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळाल्याने चंद्रकांत दादा पाटील नाराज असल्याचे माहिती समोर आली होती. आता महायुतीच्या प्रचारासाठी पुन्हा हे दोन बडे एकत्र आले आहेत

नेमकं काय झाले..?

राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मिसळीवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले. मिसळीचा आस्वाद घेताना चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोघांच्या राजकीय गप्पा रंगल्यात. मिसळ खात खात चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांची प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून अजित पवार यांना गुढी भेट म्हणून देण्यात आली.

महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यात तब्बल 10 हजार किलोची मिसळ बनवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून 10 हजार किलोची मिसळ बवनण्यात आली आहे. गंज पेठेतील महात्मा जोतीबा फुले वाडा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे