पुणे ( प्रतिनिधी ) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात “नमो चषक २०२४” स्पर्धा आयोजित केली जात आहे.भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या कोथरूड मतदार संघात या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, “नमो चषक २०२४” च्या धर्तीवर कोथरूडमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित ‘नमो चषक क्वीज’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. दि. ३ मार्च पर्यंत स्पर्धकांना या स्पर्धेत ऑनलाइन सहभाग घेता घेणार आहे.

विशेष म्हणजे, 5 मिनिट इतक्या अवधीसाठी असणाऱ्या या स्पर्धेत रोख रक्कमेचे बक्षीस मिळविता येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी bit.ly/namoquizkothrud या लिंक वर क्लिक करुन नोंदणी करा, खेळा आणि भरघोस बक्षिसे मिळवा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.