पुणे ( प्रतिनिधी ) उत्तर भारतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला साजरा होणार सर्वात मोठा सण म्हणजे छट पूजा ! आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे संक्रांतीला सूर्याची उपासना करतात त्याचप्रमाणे उत्तर भारतात दिवाळीनंतर छट पूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना केली जाते. स्त्रिया निर्जल उपवास करून सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडतात.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून या पूजेची सुरुवात असल्याने याला छट पूजा तसेच सूर्य षष्ठी पूजा असेही म्हणतात. रविवारी सर्वत्र छट पूजा सर्वत्र साजरी करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या पूजेत सहभाग घेतला.

कोथरुडमधील पाषाण भागातील उत्तर भारतीय बांधवांनी रविवारी छट पूजनाचे आयोजन केले होते. चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या आणि छट पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पूजेत सहभागी होत प्रार्थना देखील केली.