नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७० दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. हे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्यावरही या प्रश्नी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता भारतीय किसान युनियननं चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे.

६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेरही तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारे वर्तन करते याची माहिती देखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ, असे टिकैत यांनी सांगितले.