राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला चौथे सुवर्णपदक

लंडन (वृत्तसंस्था) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे सुवर्ण जिंकले आहे. पाचव्या दिवशी, भारताने महिला लॉन बॉल्सच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय लॉन बॉल्स महिला संघाने पदक जिंकले आहे. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की या भारतीय खेळाडूंनी सामन्यात… Continue reading राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला चौथे सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेचा आज रात्री उद्घाटन सोहळा

लंडन : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कॉमनवेल्थ गेम्सना आजपासून (२८ जुलै) सुरुवात होत आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या स्पर्धेत भारताचे १०८ पुरुष आणि १०७ महिला खेळाडू विविध अशा १५ खेळांमध्ये सहभागी होतील. भारतीय संघाचे नेतृत्त्व ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह करणार आहेत. हे… Continue reading राष्ट्रकुल स्पर्धेचा आज रात्री उद्घाटन सोहळा

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रानिल विक्रमसिंघे यांची निवड

कोलोंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रानिल विक्रमसिंघे यांची निवड झाली आहे. राष्ट्राध्यपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर झालेल्या काट्याच्या लढाईत रानिल विक्रमसिंघे यांनी अखेर बाजी मारली. विक्रमसिंघे यांनी डलास अलाहाप्पेरुमा यांचा दारुण पराभव केला. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्यानंतर रानिव विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष करण्यात आले… Continue reading श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रानिल विक्रमसिंघे यांची निवड

श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला आंदोलकांचा घेराव

कोलंबो (वृत्तसंस्था) : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, शनिवारी दुपारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी घेराव घातला. काही आंदोलकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रवेश केला. इतकेच नव्हे तर राष्ट्रपती निवासस्थानी असलेल्या स्वीमिंग पूलमध्ये ते आंघोळीचा आस्वादही घेत असल्याचे काही व्हीडिओ समोर आले आहेत. श्रीलंकेतील विविध भागातून हजारोच्या संख्येने आंदोलक… Continue reading श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला आंदोलकांचा घेराव

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

टोकियो (वृत्तसंस्था) : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निधन झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने दिली आहे. भरसभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जपानच्या नारा शहरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता (भारतीय वेळेनुसार ८.२९ वाजता) घडली. आबे यांच्या एलडीपी (लिब्रल… Continue reading जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन राजीनामा देणार

लंडन (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली आहे. जोपर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होत नाही, तोपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. ‘मला माझ्या कामगिरीचा प्रचंड अभिमान… Continue reading ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन राजीनामा देणार

मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले, इंग्लंडचा शानदार विजय

बर्मिंगहॅम : (वृत्तसंस्था) १५  वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत शानदार विजय मिळवला. इंग्लंडच्या वतीने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४ ) यांच्यातील… Continue reading मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले, इंग्लंडचा शानदार विजय

आजोबा ८५ व्या वर्षी झाले बाप

अर्जेंटिना (वृत्तसंस्था) : आपण बाळाचे बाप झालो असून, आपल्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे, अशी माहिती ८५ वर्षांच्या अल्बर्टो कोर्मिलिएट यांनी दिली आहे. ॲस्टेफनिया फर्टिलिटी ट्रिटमेंटची मदत घेऊन या जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे. प्रेम करायला वय नसते असे म्हणतात, मात्र आई किंवा बाप होण्याला नैसर्गिक मर्यादा असल्याचे अनेकदा दिसून येते. वाढत्या वयानुसार… Continue reading आजोबा ८५ व्या वर्षी झाले बाप

अभिमानास्पद ! भालाफेकीमध्ये नीरज चोप्राचा सुवर्णवेध… : देशभरात जल्लोष

टोकियो (वृत्तसंस्था) : येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहास घडवला. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. नीरज चोप्राच्या या सुवर्णमयी कामगिरीमुळे सर्व देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी नेमबाजपटू अभिनव बिंद्राने २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये… Continue reading अभिमानास्पद ! भालाफेकीमध्ये नीरज चोप्राचा सुवर्णवेध… : देशभरात जल्लोष

टोकियो ओलिंपिकमध्ये कुस्तीपटू बजरंगाची कमाल : कांस्यपदकावर कोरले नाव

टोकियो (वृत्तसंस्था) : येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदकावर नाव कोरले आहे. काही मिनिटांपूर्वी त्याने डी. नियाझबेकोव्ह याला ८-० असे पराजित केले आहे. सुरुवातीपासून नियाझबेकोव्ह याच्यावर वर्चस्व मिळवत त्याला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. बजरंगने चुका टाळून आणि आक्रमण व बचाव याचा सुरेख… Continue reading टोकियो ओलिंपिकमध्ये कुस्तीपटू बजरंगाची कमाल : कांस्यपदकावर कोरले नाव

error: Content is protected !!