गगनबावडा (संभाजी सुतार) : गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीपैकी १९ ग्रामपंचायतीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे.

तालुक्यातील तीन ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या, तर १८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली. यामध्ये ३ सरपंच बिनविरोध तर ३ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी निवडणूक लागली व १५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्यपदासाठी थेट निवडणूक लागली. यामध्ये तिसंगी येथे जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील विरुद्ध बंकट थोडगे यांची समविचारी स्थानिक आघाडी यांच्यात काट्याची टक्कर अशी लढत पाहायला मिळाली. यामध्ये समविचारी स्थानिक आघाडी पॅनेलचे सर्जेराव पाटील हे २२२ मतांनी विजयी झाले.

खोकुर्ले येथे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. यामध्ये नाना पाटील गटाच्या सुनीता कांबळे यांचा ३६३ मतांनी विजयी झाल्या. खेरीवडे येथेही काँग्रेस विरूद्ध काँगेस अशी लढत झाली यामध्ये शारदा पाटील या ९७ मतांनी विजयी झाल्या. जर्गी सुलाबाई आंबुस्कर या १४६ मतांनी विजयी झाल्या. धुंदवडे येथे काँग्रेसचे मारुती पाटील (एमजी) हे ५६९ मतांनी विजयी झाले. शेळोशी येथे भारती कांबळे या २७० मतांनी विजयी झाल्या. बोरबेट येथे शिवसेनेचे संतोष पाटील हे उमेदवार सरपंचपदासाठी १३९ मतांनी विजयी झाले.

साखरी/म्हाळुंगे येथे एकूण ४ उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात होते. त्यापैकी किरण कांबळे यांचा १६८ मतांनी विजयी झाले. मणदूर येथे ही काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. यामध्ये दत्ता (अण्णा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा सरपंचपदाचा उमेदवार नामदेव कांबळे ९३ मतांनी विजयी कडवे – रेश्मा परीट (काँग्रेस)

बावेली- सागर सावंत (काँग्रेस) मांडुकली- राजाराम तुकाराम पाटील (काँग्रेस) तळये बुद्रक – केरबा दादू पाटील ( काँग्रेस) असेच २१ ग्रामपंचायती पैकी गगनबावडा तालुक्यात १९ ग्रा.पं. मध्ये सतेज पाटील यांचाच बोलबाला झाला.

बिनविरोध सरपंच :  शोभा विलास पाटील (कोदे, काँग्रेस), परशराम खानविलकर (मार्गेवाडी- काँग्रेस), सरिता पाटील (अणदूर, काँग्रेस), वैशाली गावकर (असळज, काँग्रेस), उज्वला पाटील (शेणवडे, काँग्रेस), संतोष गुरव (वेसर्डे, शिवसेना).

साखरी येथे कोटकर यांचे वर्चस्व सिद्ध

साखरी येथील ग्रामपंचायत निवडणूक ही साधारण ५० वर्षांंनंतर एक वेळची पोटनिवडणूक वगळता पहिल्यांदाच झाली असल्याने या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागले होते. यापूर्वी गावातील तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होत होती. सध्या या ग्रामपंचायतीवर डी वाय पाटील साखर कारखान्यचे व्हा. चेअरमन बी. डी. कोटकर यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.