रुकडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन…

हातकणंगले (प्रतिनिधी) : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या म. गांधी विद्यालयाच्या वसतिगृहात ग्रामपंचायत रुकडी व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते उद्घाटन या सेंटरचे उद्घाटन झाले. रुकडी, अतिग्रे, माले, मुडशिंगी, माणगाव, हेरले, चोकाक या गावांतील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. माजी खासदार निवेदिता… Continue reading रुकडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन…

शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’कडे ‘या’ विषयी मागितली महत्त्वपूर्ण माहिती…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या गोकुळच्या टॅंकरच्या बिलावरून पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर त्याला गोकुळच्या संचालक सौ. शौमिका महाडिक यांनी थेट  प्रत्युत्तर देऊन टँकरच्या माध्यमातून चुकीचे काही झाले असेल तर गुन्हे दाखल करावेत असे आव्हान दिले. त्याबरोबरच त्यांनी आज (बुधवार) ‘गोकुळ’मधील दूध वाहतुकीच्या भाड्याबाबत मागील दहा वर्षांतील सविस्तर माहिती संघाच्या कार्यकारी संचालकांकडे… Continue reading शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’कडे ‘या’ विषयी मागितली महत्त्वपूर्ण माहिती…

अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘आप’चे सम्राटनगर येथे ओढ्यात उतरून आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील ओढ्यात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढ्या शेजारील घरांमध्ये पाणी येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र याविरुद्ध कोणतीच कार्यवाही न झाल्याने आम आदमी पक्षातर्फे आज (बुधवार) सम्राटनगर येथील ओढ्यात उतरून आंदोलन करण्यात आले. सम्राटनगर येथील ओढ्यामध्ये एका अपार्टमेंटची सुरक्षा भिंत (रिटेनिंग वॉल) व ‘बीएसएनएल’ने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात… Continue reading अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘आप’चे सम्राटनगर येथे ओढ्यात उतरून आंदोलन

कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा… : चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासन तसेच जिल्हा प्रशासनाने काढलेल्या अनलॉकच्या परिपत्रकानुसार व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले आहेत. शासनाच्या ४ जून २०२१ रोजीच्या नवीन परिपत्रकातील चुकीच्या नियमाप्रमाणे या आठवड्यात देखील व्यापार सुरु होऊ शकलेला नाही. मात्र, आता दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अन्यथा उद्या (बुधवार) रस्त्यावर उतरण्याचा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत… Continue reading कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा… : चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

जोरदार वारा व पावसामुळे खेरीवडे, घरपण येथे नुकसान

कळे (प्रतिनिधी) : सोसाट्याचा वारा व पावसामुळे खेरीवडे (ता.पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेचे नुकसान झाले. येथे वाकोबा मंदिराला लागून शाळेच्या दोन खोल्या आहेत. यापैकी एका खोलीची भिंत कोसळून सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाले. याचबरोबर घरपण येथे कोल्हापूर-गगनबावडा मार्गाशेजारी असलेल्या बंडोपंत कृष्णात चौगले यांच्या राहत्या घराची स्वंयपाक खोलीची भिंत शेजारी असलेल्या शेतवडीत पडली. सुमारे तीस हजाराचे नुकसान… Continue reading जोरदार वारा व पावसामुळे खेरीवडे, घरपण येथे नुकसान

रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात : खा. धैर्यशील माने यांची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात रासायनिक खतांच्या किमंती वाढल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात. अशी मागणी पत्राद्वारे रासायनिक आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडाजी यांचेकडे खा. धैर्यशील माने यांनी केली आहे. पत्रात म्हंटले आहे की,  रासायनिक खतांच्या किमंतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झालेली आहे. गेल्या दिड वर्षापासून शेतीची… Continue reading रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात : खा. धैर्यशील माने यांची मागणी

गिरगावच्या जवानांची सामाजिक बांधिलकी : दिले ऑक्सिजन मशीन भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) :गिरगांव ता.करवीर येथील सर्जेराव कुरणे या कारगिल युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. पुन्हा ही स्थिती कोणावर येऊ नये म्हणुन गावातील सीमेवर तैनात असलेल्या आजी सैनिकांनी गावात सुरू असलेल्या कोविड सेंटरला आज ऑक्सिजन मशीन भेट दिले. गावात सुट्टीवर असलेल्या जवानांनी हे मशीन रुपेश पाटील आणि भास्कर कुरणे यांच्याकडे सुपूर्द… Continue reading गिरगावच्या जवानांची सामाजिक बांधिलकी : दिले ऑक्सिजन मशीन भेट

सांडपाणी निचऱ्यावरून ग्रामपंचायत व रहिवाशी यांच्यात हाणामारी ; गुन्हा दाखल

कळे (प्रतिनिधी) : वारनुळ (ता.पन्हाळा) येथे सांडपाणी निचऱ्यावरून ग्रामपंचायत व रहिवाशी यांच्यात जोरात जुंपली. दरम्यान, खुद्द सरपंच व ग्रामपंचायत शिपाई यांनी स्थानिकांना मारहाण केली. याबाबत कळे पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली. वारनुळ ग्रामपंचायतीने गणेश गल्लीतील सांडपाणी श्रीमती रंजना मारुती पोवार यांच्या शेतीत सोडले आहे. सांडपाणी, प्लास्टिक कचरा यामुळे पिकाची नुकसानी होते. तसेच दुर्गंधी पसरली… Continue reading सांडपाणी निचऱ्यावरून ग्रामपंचायत व रहिवाशी यांच्यात हाणामारी ; गुन्हा दाखल

‘मुश्रीफ साहेब’ तर मीही सहआरोपी व्हायला तयार आहे – अमल महाडिक  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर २ दिवसांपूर्वी मी माझे मत मांडले. त्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया पाहिली. तुम्ही म्हणताय ‘गोकुळच्या निवडणूक प्रचारात अमल महाडिक सुद्धा होते. तर त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे’ याचाच अर्थ असा होतो की, ती निवडणूक लादणे चुकीचे होते आणि त्यासाठी तुम्ही गुन्ह्याला पात्र आहात हे मान्य करत आहात, अश्या… Continue reading ‘मुश्रीफ साहेब’ तर मीही सहआरोपी व्हायला तयार आहे – अमल महाडिक  

कुख्यात गँगस्टर छोटा राजनचे कोरोनामुळे निधन…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  कुख्यात गँगस्टर छोटा राजन याचा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राजनला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी त्याला एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, आज (शुक्रवार) त्याचे निधन झाले आहे. छोटा राजन सध्या तिहार तुरूंगात शिक्षा भोगत होता.  छोटा राजन १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता.… Continue reading कुख्यात गँगस्टर छोटा राजनचे कोरोनामुळे निधन…

error: Content is protected !!