होम आयसोलेटेड रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी होम आयसोलेटेड रुग्णांवर आता महापालिका व पोलिस पथकांचा वॉच राहणार आहे. कोरोनाबाधित होम- आयसोलेटेड रुग्णांच्या घरी अचानक भेटी देऊन होम आयसोलेटेड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. शहरातील वाढता कोरोना संसर्ग विचारात घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना… Continue reading होम आयसोलेटेड रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नव्या ४९३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, दिवसभरात ६२९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६०५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जुनी कोर्ट इमारत द्या : जिल्हा कृती समिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढला आहे. सर्व रूग्णांवर उपचाराठी सीपीआरमध्ये जागा कमी पडत आहे. त्यामुळे सीपीआरजवळील जुनी कोर्टाची इमारत कोरोना उपचार केंद्रासाठी द्यावी अशी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे सरकारकडे करण्यात आली. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर… Continue reading जुनी कोर्ट इमारत द्या : जिल्हा कृती समिती

हसन मुश्रीफ लवकर बरे व्हावेत म्हणून महादेवाला महाअभिषेक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रतील गरिबांचे आणि गरजूंचे महा डॉक्टर, वृद्धांचे श्रावणबाळ, लाखो कार्यकर्त्यांचे दैवत, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे लवकर बरे व्हावेत म्हणून कोल्हापूर येथील रावणेश्वर मंदिरातील महादेवाला लघु रुद्र महाअभिषेक घालण्यात आला. हसन मुश्रीफ हे कोरोनावर यशस्वी मात करून लवकर परत जनसेवेत पुन्हा नव्या जोमाने रुजू व्हावेत. तसेच ईश्वर त्यांना भविष्यात उदंड आयुष्य… Continue reading हसन मुश्रीफ लवकर बरे व्हावेत म्हणून महादेवाला महाअभिषेक

श्री छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळाकडून स्मशानभूमीस शेणींसाठी ५१ हजारांचा धनादेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील लोकांवरही शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. नियोजनापेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने महापालिकेला अंत्यसंस्कारासाठी  शेणींची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक मंडळ, समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांना शेणीदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या उपक्रमाचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत महापालिकेच्या स्मशानभूमीस… Continue reading श्री छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळाकडून स्मशानभूमीस शेणींसाठी ५१ हजारांचा धनादेश

कळे येथे कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील एकाच कुटूंबातील दोन सख्खे भाऊ आणि आई अशा तिघांचा आज (शनिवार) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कुटूंबाचा कळे गावात ट्रेडर्सचा व्यवसाय आहे. या कुटुंबाकडून परिसरातील अनेक गरजूंना सहकार्य केले जात होते. कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

आजऱ्यात पोलिसांची एकाकी ‘कोरोना लढाई’

आजरा (प्रतिनिधी) : तालुक्यासह शहरात मागील १५ दिवसांमध्ये वाढलेल्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित करण्यास आजरा पोलीस एकाकी लढा देत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ३८१ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे संसार्गावर थोडा का होईना वचक बसला आहे. प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ३८ हजार रुपये दंड संबंधितांकडून वसूल करीत सामाजिक वावर आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा… Continue reading आजऱ्यात पोलिसांची एकाकी ‘कोरोना लढाई’

कोरोनाच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक फसवणूक : चेतन पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर खाजगी दवाखान्यात कोरोनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यांनी शासकीय नियमाप्रमाणेचं बिलाची आकारणी करावी, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगर अध्यक्ष चेतन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान,… Continue reading कोरोनाच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक फसवणूक : चेतन पाटील

मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव आणणार : संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. विविध माध्यामांतून जोरदार आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी खासदारांसह आमदारांच्या वर दबाव आणण्यात येणार असल्याचे मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष चेतन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्यात होणारी पोलीस… Continue reading मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव आणणार : संभाजी ब्रिगेड

महाड दुर्घटनेमध्ये मदतीला धावलेल्या व्हाईट आर्मीचा सत्कार

कोल्हापूर : महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या व्हाईट आर्मी, NDRF, तसेच इतर सेवाभावी संस्थाचा पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकरी निधी चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, तहसिलदार सुरेश काशीद आदि उपस्थित होते. पालकमंत्री तटकरे म्हणाल्या, ‘नैसर्गिक आपत्तीच्या… Continue reading महाड दुर्घटनेमध्ये मदतीला धावलेल्या व्हाईट आर्मीचा सत्कार

error: Content is protected !!