कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील एकाच कुटूंबातील दोन सख्खे भाऊ आणि आई अशा तिघांचा आज (शनिवार) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कुटूंबाचा कळे गावात ट्रेडर्सचा व्यवसाय आहे. या कुटुंबाकडून परिसरातील अनेक गरजूंना सहकार्य केले जात होते. कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.