‘रेमडीसिवीर’सह अन्य सामग्री दोन दिवसात : पालकसचिव राजगोपाल देवरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे जागोजागी लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे. जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार २ दिवसात रेमडीसिवीरसह अन्य आरोग्य सामग्री पुरविली जाईल, अशी ग्वाही पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड १९ उपाययोजना बाबत आढावा बैठक झाली.… Continue reading ‘रेमडीसिवीर’सह अन्य सामग्री दोन दिवसात : पालकसचिव राजगोपाल देवरा

कुरुकलीच्या कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षक समितीकडून ऑक्सिजन निर्मिती जनरेटर प्रधान

कोथळी – करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यामध्ये कुरुकली येथे असलेल्या कोविड सेंटरला करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले व आरोग्य अधिकारी जी. डी. नलवडे यांच्याकडून प्राथमिक हा ऑक्सिजन निर्मिती जनरेटर प्रदान करण्यात आला. प्रत्येक तालुक्याला एक प्रमाणे जिल्ह्यात बारा ऑक्सिजन निर्मिती जनरेटर प्रधान करण्यात आला. तसेच जिल्ह्यामध्ये एक रुग्णवाहिका प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये समितीच्या दोन… Continue reading कुरुकलीच्या कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षक समितीकडून ऑक्सिजन निर्मिती जनरेटर प्रधान

कळे पोलीस अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या परिसरात कोरोनाच्या काळातही बिअर बार रात्री १० पर्यंत खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. परवा कळेतील एका बिअर बारवर पोलिसांनी छापा टाकला आणि मालकावर कारवाई केली. तरीही खुलेआम सुरू असलेल्या इतर धनदांडग्या बिअर बार मालकांना मात्र यातून सूट दिल्याचे दिसून येत आहे. राजकीय वरदहस्त आणि पोलिसांना वेळेवर मिळणारा… Continue reading कळे पोलीस अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

संजय क्षीरसागर यांचे निधन

काेल्हापूर (प्रतिनिधी) :राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे ज्येष्ठ बंधू संजय विनायकराव क्षीरसागर यांचे  दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.

ग्राहकांना व कामगार वर्गाला सांभाळून संयमाने प्रकल्प उभारणी करा : राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष सतीश मगर 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सभासदांना बांधकाम व्यवसायाच्या कठिण कालावधीमध्ये टिकून राहणे महत्वाचे आहे, असे सांगून लहान शहरातील सभासदांना चांगले व्यवसायिक मार्गदर्शन केले. ग्राहकांना व कामगार वर्गाला सांभाळून संयमाने प्रकल्प उभारणी करा, असे आवाहन राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष सतीश दादा मगर यांनी खास मुलाखतीतून केले. क्रेडाई महाराष्ट्र या राज्यव्यापी बांधकाम व्यावसायिक संघटनेस २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वार्षिक… Continue reading ग्राहकांना व कामगार वर्गाला सांभाळून संयमाने प्रकल्प उभारणी करा : राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष सतीश मगर 

सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरला आग : दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज (सोमवार) पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या घटनेने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, ट्रामा सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना तात्काळ अन्य ठिकाणी हलवण्यात आले. ही घटना समजताच प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. अग्निशमन दलाचे दोन बंब आणि पोलीस घटनास्थळी दाखल… Continue reading सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरला आग : दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 500 रुपयांचा दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम शहरात प्रभावीपणे राबविली जात आहे. आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वत: एका व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 500 रुपये दंडाची कारवाई केली. पंचगंगा हॉ‍स्पिटल रोड वरील केदारलिंग बेकरी जवळ रसूल भालदार या व्यक्तीस रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या… Continue reading सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 500 रुपयांचा दंड

आयुक्तांनी ठोठावला बेकरी, मिसळसेंटरमध्ये 2 हजारांचा दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो मास्क-नो एंन्ट्री यानुसार आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज स्वत: बुधवार पेठेतील दोन बेकरी व्यावसायिकांवर मास्क न घातल्याबद्दल प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड तर दसरा चौकातील एका मिसळ सेंटरमध्ये विनामास्क बसलेल्या पाच तरुणांवर 1 हजार रुपयांच्या  दंडाची कार्यवाही केली. आज स्वच्छता अभियानाच्यानिमित्ताने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी पंचगंगा घाट येथे गेले होते. परत… Continue reading आयुक्तांनी ठोठावला बेकरी, मिसळसेंटरमध्ये 2 हजारांचा दंड

अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश यांचे कोरोनामुळे निधन

अकोला (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये (७१) यांचे कोरोनामुळे आज (रविवार) निधन झाले. पंधरा दिवसापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. मात्र, अचानक औषधोपचाराला साथ न दिल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची बाब पुढे आली आहे. डॉ. इंदुप्रकाश गजभिये हे शरीरक्रियाशास्त्र विषयाचे तज्ञ होते. शासकीय… Continue reading अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश यांचे कोरोनामुळे निधन

मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून : मणेर मळा येथील घटना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : किरकोळ वादातून मुलग्याने कात्रीने भोसकून वडिलांचा आज (रविवार) खून केला. चंद्रकांत भगवान सोनुले (वय 48, रा. मुळ गाव भिलवडी, जि. सांगली) सध्या राहणार (इंद्रजीत कॉलनी मणेरमळा, उचगाव, ता.करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर चंद्रकांत सोनुले (वय 24) याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मणेर… Continue reading मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून : मणेर मळा येथील घटना

error: Content is protected !!