कोल्हापूर (प्रतिनिधी) : किरकोळ वादातून मुलग्याने कात्रीने भोसकून वडिलांचा आज (रविवार) खून केला. चंद्रकांत भगवान सोनुले (वय 48, रा. मुळ गाव भिलवडी, जि. सांगली) सध्या राहणार (इंद्रजीत कॉलनी मणेरमळा, उचगाव, ता.करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर चंद्रकांत सोनुले (वय 24) याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मणेर मळा येथील इंद्रजीत कॉलनीमध्ये चंद्रकांत सोनुले कुटुंबीयांसोबत राहत होते. आज दुपारी ते जेवत असताना किरकोळ कारणातून त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर याच्याशी वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात ज्ञानेश्वरने याने घरातील कात्री घेऊन चंद्रकांत सोनवणे यांच्या छातीमध्ये मारली. या कात्रीचा घाव वर्मी लागल्यामुळे चंद्रकांत सोनुले यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती कळताच गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चंद्रकांत सोनुले यांच्या खूनप्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर सोनुले याला अटक केली.