धामणीखोऱ्यात दुबार लागणीचे संकट : शेतकरी हतबल

कळे (प्रतिनिधी) : धामणी परिसरामध्ये आठवडाभर संततधार जोरदार पाऊस पडत असल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांनी केलेल्या आडसाली ऊस लागणीच्या सरीत पाणी साचून राहिल्याने याचा ऊसाच्या उगवणीवर परिणाम होत आहे. त्यामुळे दुबार ऊस लागण करावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात लागणी लावल्या आहेत. परंतु पुन्हा जोरदार पाऊस पडत… Continue reading धामणीखोऱ्यात दुबार लागणीचे संकट : शेतकरी हतबल

‘स्तुति’ प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींसाठी पन्हाळा सहल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी दोन मार्गदर्शनपर व्याख्यानानंतर सहभागींना किल्ले पन्हाळाची शैक्षणिक सहल घडविण्यात आली. पहिल्या सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. राजाराम माने यांनी ‘नॅनोस्ट्रक्चर आणि त्यांचे उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. राजेंद्र सोनकवडे यांनी प्रा. माने यांचा सत्कार केला. दुसऱ्या सत्रात शिवाजी… Continue reading ‘स्तुति’ प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींसाठी पन्हाळा सहल

कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोल्हापूरच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून… Continue reading कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.… Continue reading शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

कोल्हापूरच्या कविता चावला ठरल्या करोडपतीच्या मानकरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या सिझनच्या पहिल्या करोडपती होण्याच्या मानकरी गांधीनगरमधील गृहिणी कविता चावला या ठरल्या आहेत. गांधीनगरच्या कविता चावला यांनी केबीसीमध्ये एकापाठोपाठ एक बिनचूक उत्तरे देत १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले. मोठ्या महत्प्रयासाने त्यांनी हॉटसीटवर बसण्याचा बहुमान मिळवला. ‘कोल्हापुरी जगात लय भारी’ या घोषणांमुळे मला खुप प्रोत्साहन मिळाल्याचेही… Continue reading कोल्हापूरच्या कविता चावला ठरल्या करोडपतीच्या मानकरी

वालावलकर हॉस्पिटलतर्फे आरोग्य, नेत्र शिबिर संयोजनाची तयारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) आगामी नवरात्र उत्सव आणि दिवाळी दरम्यान ठिकठिकाणी होणाऱ्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरचे संयोजन करण्यास शिवाजी उद्यमनगरमधील श्री पंत वालावलकर हॉस्पिटल तयार आहे. अशा प्रकारचे शिबिर भरवणाऱ्या तरुण मंडळे, तालीम संस्था, महिला बचत गट, दांडिया समूह यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन, वालावलकर हॉस्पिटलचे प्रमुख संचालक संतोष कुलकर्णी यांनी केले आहे. या शिबिरामधून… Continue reading वालावलकर हॉस्पिटलतर्फे आरोग्य, नेत्र शिबिर संयोजनाची तयारी

सांगलीतील शैक्षणिक अधिवेशनाचे राजू शेट्टी यांना निमंत्रण

शिरोळ (प्रतिनिधी) :सांगली येथे होणाऱ्या शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण माजी खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आले आहे. महामंडळाच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एन. डी. बिरनाळे, प्रा. एम. एस. रजपूत व विनोद पाटोळे यांनी शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन हे निमंत्रण दिले. शिक्षण संस्थांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी… Continue reading सांगलीतील शैक्षणिक अधिवेशनाचे राजू शेट्टी यांना निमंत्रण

आसुर्ले येथे एकावर जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील बाबासाहेब गणपती पाटील याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व नागरी हक्क संरक्षण कायदा (ॲट्रॉसीटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. गावातील राजू दिनकर चावरेकर याच्या टेम्पोमधून कामावर जानाऱ्या महिला प्रवास करीत असतात. अन्य महिलांना टेम्पोमध्ये बसण्याकरिता टेम्पो आसुर्ले येथील रस्त्यावर थांबवला असता यातील आरोपी बाबासाहेब… Continue reading आसुर्ले येथे एकावर जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा

‘स्तुति’च्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे दोन शास्त्रज्ञ उपस्थित होते. त्यांनी सहभागींना अतिशय उपयोगी असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांविषयी सविस्तर माहिती दिली. पहिल्या सत्रात डॉ. सी. गोपीनाथ यांनी फोटो ‘इलेक्ट्रॉन एमिशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. संजय चव्हाण यांनी डॉ. गोपीनाथ यांचा सत्कार केला. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या… Continue reading ‘स्तुति’च्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

सूर्यवंशीवाडी-येळावी येथे ५.५० लाखांची वीज चोरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  सांगली जिल्ह्यातील सूर्यवंशीवाडी, येळावी (ता. तासगाव) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकाची वीज चोरी महावितरणने पकडली आहे. या ग्राहकाने वीज मीटर बायपास करून थेट जोडणीद्वारे वीज वापर करीत ३९ हजार ७८८ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे ५ लाख ५० हजार रुपयांची वीज चोरी केली. या प्रकरणी महावितरणने वीज वापरकर्ते अनिकेत जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याविरूध्द वीज… Continue reading सूर्यवंशीवाडी-येळावी येथे ५.५० लाखांची वीज चोरी

error: Content is protected !!