वडगाव एसटी आगाराचे ३५ वर्षे भिजत घोंगडे

पेठवडगाव (प्रतिनिधी) : गेली सुमारे ३५ वर्षे वडगाव येथील एसटी आगाराचे घोंगडे भिजत पडले असून, याकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. १९८७ साली वडगाव नगरपालिकेचा सुवर्णमहोत्सव तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी वडगाव येथे एसटी डेपो होत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी जनतेने त्याचे स्वागत केले; परंतु या घटनेला… Continue reading वडगाव एसटी आगाराचे ३५ वर्षे भिजत घोंगडे

लहान कारखानदारांना सवलती देण्याची ‘एकमो’ ची मागणी

टोप (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील लहान कारखानदारांनाही शासनाच्या सवलती मिळाव्यात. तसेच उद्योगासाठी त्यांना सवलतीच्या दरात भूखंड मिळावेत, अशी मागणी इंजिनिअरिंग कंपोनंट्स मशिनिंग ओनर्स वेल्फर असोसिएशन (एकमो) या संघटनेने केली आहे. जिल्हास्तरीय या लहान कारखानदारांच्या संघटनेचा मेळावा आज भगवती कार्यालयात पार पडला. या मेळाव्याला ४०० हून अधिक सभासद उपस्थित होते. फौंड्री उद्योजकांना ऑटोमोबाईल व इंजिनिअरिंग पार्टसचे कास्टिंग,… Continue reading लहान कारखानदारांना सवलती देण्याची ‘एकमो’ ची मागणी

कोल्हापुरात मतदार जागृतीबाबत सायकल रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती सायकल रॅली काढण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता (सामाजिक शास्त्र) डॉ. एम. एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय… Continue reading कोल्हापुरात मतदार जागृतीबाबत सायकल रॅली

‘रोट्रॅक्ट’च्या ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’च्या रांगोळीने वेधले लक्ष

कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सवानिमित्त पंचगंगा नदी घाट असंख्य करवीरवासीयांच्या उपस्थितीत दिव्यांनी उजळून निघाला. नदी घाटावर अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या अनेक संस्था, संघटना यांच्याकडून साकारण्यात आल्या. यावेळी लक्ष वेधून घेतले ते रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्यांनी साकारलेल्या थुंकीमुक्त कोल्हापूर या संदेशाच्या रांगोळीने. कोल्हापुरात अजूनही ठिकठिकाणी लोक मावा खाणे, तंबाखू खाणे आणि जागोजागी… Continue reading ‘रोट्रॅक्ट’च्या ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’च्या रांगोळीने वेधले लक्ष

गायरानप्रश्नी सर्वपक्षीयांना घेऊन मार्ग काढू : अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यभरातील गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु गायरानप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित घेऊन मार्ग काढू अशी माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली आहे. अतिक्रमण काढण्याच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंब बेघर होतील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त असल्याने जवळजवळ सव्वालाख कुटुंबाना याचा फटका बसू शकतो. गावखेड्यांमध्ये विविध कारणांमुळे आजतागायत नियमित… Continue reading गायरानप्रश्नी सर्वपक्षीयांना घेऊन मार्ग काढू : अमल महाडिक

‘गोडसाखर’ला ऊर्जितावस्था आणणार : आमदार मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील कै. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्यातील अनेक समस्या दूर कारखान्याला ऊर्जितावस्था आणून सभासदांचे हित जोपासले जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. ‘गोडसाखर’ कारखान्याच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना आ. मुश्रीफ म्हणाले, सर्व सभासद, हितचिंतक, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी यांनी छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व उमेदवार निवडून दिले… Continue reading ‘गोडसाखर’ला ऊर्जितावस्था आणणार : आमदार मुश्रीफ

मनसेचे पेठ वडगाव एसटी आगाराला निवेदन…

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळापासून अंबप, अंबपवाडी, मनपाडळे गावांसह वाठारमार्गे जाणार एसटी बस बंद केली होती. ती त्वरीत सुरु करावी, अशी मागणीचे निवेदन मनसे उपतालुकाध्यक्ष वैभव भोसले यांनी पेठ वडगांव आगाराला दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळापासून अंबप, अंपबवाडी, मनपाडळे, वडगाव तसेच परिसरातील एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थांचे नुकसान होत आहे.… Continue reading मनसेचे पेठ वडगाव एसटी आगाराला निवेदन…

शिष्यवृत्ती पात्रता यादीत कोल्हापूर राज्यात अव्वल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जुलैमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या पात्रता यादीत कोल्हापूरने (२८ टक्के) अव्वल स्थान पटकावले. या यशाबद्दल जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसह प्रशासन अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती… Continue reading शिष्यवृत्ती पात्रता यादीत कोल्हापूर राज्यात अव्वल

डॉ. अभिनंदन पाटील यांना ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे सहयोगी प्रा. डॉ. अभिनंदन पाटील यांना ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. बेंगळुरू येथील हॉटेल ताज येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री अम्रीता रॉय हिच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संशोधन, चित्रपट, प्रसारमाध्यमे आणि ब्रँडिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘ब्लाईंडविक’ या संस्थेकडून इंडिया एक्सलन्स अवॉर्डने सन्मान केला… Continue reading डॉ. अभिनंदन पाटील यांना ‘इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’

शिक्षणशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. कृष्णा पाटील 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षणशास्त्र विषयातून बी.एड., एम.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. कृष्णा पाटील यांनी केले. विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन व शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने ऑनलाईन दुहेरी पदवी मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखा अधिष्ठाता… Continue reading शिक्षणशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. कृष्णा पाटील 

error: Content is protected !!