प्रतापगडावर उभारले जाणार शिवप्रताप स्मारक  

सातारा (प्रतिनिधी) : शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. यामुळे राज्य सरकारच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमी संघटनांकडून करण्यात येत होती. साताऱ्याच्या हिंदू एकता आंदोलन संघटनेकडूनही याबाबतचे पत्र पर्यटन मंत्र्यांना देण्यात… Continue reading प्रतापगडावर उभारले जाणार शिवप्रताप स्मारक  

प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी

सातारा (प्रतिनिधी) : साताऱ्या जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या  अफजल खानच्या कबरीजवळ  आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. दरम्यान,… Continue reading प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी

सातारजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सातारा (प्रतिनिधी) : शहरालगत असणाऱ्या खिंडवाडीजवळ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्‍यावेळी बिबट्याचा मृत्यू झाल्‍याचे निष्‍पन्न झाले. हा बिबट्या नर जातीचा असून, त्‍याचे वय अंदाजे दोन वर्ष आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्‍याला तात्काळ गाडीत घालून शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या वैद्यकीय… Continue reading सातारजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुकीची शक्यता : सुप्रिया सुळे

कराड (प्रतिनिधी) : राज्य सरकार अस्थिर असल्यामुळे सर्वच पक्षातील लोकांचा कानोसा घेतल्यास त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असे सूतोवाच खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. कराडमध्ये त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ‘ईडी’च्या ९५ टक्के कारवाया या विरोधकांवर झाल्याचा आरोप करून खासदार सुळे म्हणाल्या, की… Continue reading राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुकीची शक्यता : सुप्रिया सुळे

साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साताऱ्यामध्ये आज (रविवार) वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यामध्ये एक अघिटत घटना घडली आहे. या स्पर्धेत एका कोल्हापूरच्या धावपटूचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज कांतीलाल पटेल (वय ३०, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. साताऱ्यामध्ये आज वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूरचा धावपटू… Continue reading साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

…तर शहीद होण्याचा धोका होता : मुख्यमंत्री

सातारा (प्रतिनिधी) : बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. असे खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावाजवळील तापोळा येथे बोलत होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील तापोळा- दरे परिसरात आले होते. तापोळ्यात एकनाथ… Continue reading …तर शहीद होण्याचा धोका होता : मुख्यमंत्री

संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली : शंभूराज देसाई

सातारा (प्रतिनिधी) : ‘खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही. तर शरद पवार जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही.’ असे म्हणत माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन्ही दिग्गज नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.  राज्यामध्ये बंड झाल्यानंतर या बडांमध्ये शंभूराज देसाई यांनी शिवसेनेची फारकत घेत शिंदे गटांमध्ये सामील होण्याचा निर्णय… Continue reading संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली : शंभूराज देसाई

मी ‘गोकुळ’च्या रिंगणातच… अफवांवर विश्वास ठेवू नका ! : रवींद्र आपटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी गोकुळ संघाच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहेच. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव मी या निवडणुकीमध्ये उतरणार नसल्याची चर्चा जाणीवपूर्वक विरोधक करत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. आपटे यांनी आज (गुरुवार) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मतदारांना तर आवाहन केलेच, त्याचबरोबर विरोधकांवरही निशाणा साधला. त्यांनी… Continue reading मी ‘गोकुळ’च्या रिंगणातच… अफवांवर विश्वास ठेवू नका ! : रवींद्र आपटे

साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे झाली आहेत, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. १… Continue reading साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

महाबळेश्वर पर्यटनास खुले; पण…

सातारा (प्रतिनिधी) : मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटनास उद्यापासून (बुधवार) परवानगी देण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाचगणी, वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडेस्वारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने काही नियमावलीही जाहीर केली आहे. कोरोनामुळे महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे मागील सात महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनक नाराज होते.… Continue reading महाबळेश्वर पर्यटनास खुले; पण…

error: Content is protected !!