सातारा (प्रतिनिधी) : शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. यामुळे राज्य सरकारच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमी संघटनांकडून करण्यात येत होती.

साताऱ्याच्या हिंदू एकता आंदोलन संघटनेकडूनही याबाबतचे पत्र पर्यटन मंत्र्यांना देण्यात आले होते. या संदर्भात राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एक आदेश काढला. या आदेशानुसार प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक उभारले जाणार असून, या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला, याचा देखावा असणार आहे. सोबत लाईट आणि साऊंड शो असेल. शिवप्रताप स्मारक उभारण्याच्या या निर्णयामुळे शिवरायांचा ज्वलंत इतिहास उजळून निघणार आहे.