मुख्याधिकारी जाधव यांची इचलकरंजीला पदोन्नतीने बदली

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीचे पत्र शासनाचे अव्वर सचिव अ. का. लक्कस यांनी दिले आहे. निखिल जाधव यांनी कुरुंदवाड येथे २०१९-२०, २०२१ या वर्षांमध्ये कोरोना, महापूर या काळात उल्लेखनीय कार्य केले होते. याचबरोबर शहराच्या… Continue reading मुख्याधिकारी जाधव यांची इचलकरंजीला पदोन्नतीने बदली

नवरात्रोत्सवात भाविकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवा : क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. नवरात्रोत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत; परंतु ही कामे मुदतीत… Continue reading नवरात्रोत्सवात भाविकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवा : क्षीरसागर

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही : फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि दुष्काळी भागासाठी असलेल्या बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांबरोबर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे आता केंद्र सहाय्यीत सिंचन योजनांसह राज्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा… Continue reading रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही : फडणवीस

दसरा-दिवाळीला अंबाबाई मंदिर परिसरात वाहतूक सुरू राहणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दसरा-दिवाळीला अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय आज व्यापाऱ्यांच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर रोड परिसरात बॅरिकेड्स लावून सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. परिणामी येथे असणाऱ्या सर्वच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. परिणामी यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासन, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व महाद्वार रोड… Continue reading दसरा-दिवाळीला अंबाबाई मंदिर परिसरात वाहतूक सुरू राहणार

ऑल इंडिया कमिटीवर आशा वर्कर संघटनेच्या कॉ. उज्ज्वला पाटील यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या अधिवेशनात कोल्हापुरच्या कॉम्रेड उज्ज्वला पाटील यांच्या सह महाराष्ट्रातील तिघींची आशा वर्कर आणि गट प्रवर्तक संघटनेच्या आँल इंडिया कमिटीवर निवड करण्यात आली. कुरूक्षेत्र हरियाणा येथे आशावर्कर व गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना पहिल्या अधिवेशनात झाली. या अधिवेशनात अधिवेशनात देशभरातून २८६… Continue reading ऑल इंडिया कमिटीवर आशा वर्कर संघटनेच्या कॉ. उज्ज्वला पाटील यांची निवड

जितेंद्र आव्हाड यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दणका

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतले सर्व शासन निर्णय रद्द करून त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा धक्का दिला आहे. गृहनिर्माण क्षेत्राशी निगडित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे पुन्हा म्हाडा आणि विभागीय मंडळांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर सत्तेवर… Continue reading जितेंद्र आव्हाड यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दणका

‘फॉक्सकॉन’पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार : उदय सामंत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फॉक्सकॉन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच अशी बैठक घेऊन कंपनीला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.… Continue reading ‘फॉक्सकॉन’पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार : उदय सामंत

बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार : आदित्य ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : वेदांता समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही गुजरातेतील भरूचमध्ये जाणार आहे. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. रायगडमध्ये बल्ब ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी… Continue reading बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार : आदित्य ठाकरे

लम्पीची साथ : आर्थिक मदत देण्याची खा. धैर्यशील मानेंची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सांगली जिल्हयामधील जनावरांच्या लम्पी साथीवर त्वरित उपाययोजना करण्याबाबत व लम्पी साथीमधील मृत जनावरांना आर्थिक मदत देण्याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन चर्चा केली. यावर मंत्री विखे-पाटील यांनी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यात येऊन आढावा घेणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांना सांगितले. कोल्हापूर व… Continue reading लम्पीची साथ : आर्थिक मदत देण्याची खा. धैर्यशील मानेंची मागणी

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे… Continue reading नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय

error: Content is protected !!