गोवा शिपयार्डच्या वित्त संचालकपदी गडहिंग्लजचे सुनील बागी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : देशाच्या सागरी सीमा संरक्षणासाठी युद्धनौका बनवण्यात अग्रगण्य अशा गोवा शिपयार्डच्या वित्त संचालकपदी सुनील एस. बागी यांची नियुक्ती झाली आहे. मूळचे गडहिंग्लजचे सुपुत्र असलेल्या सुनील बागी यांनी नुकताच वित्त संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. बागी त्यांच्याकडे गेल्या ३० वर्षांहून अधिक वेगवेगळ्या वित्तिय कार्याचा अनुभव आहे. ते वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवीधर असून, कॉस्ट अकाऊंटंट… Continue reading गोवा शिपयार्डच्या वित्त संचालकपदी गडहिंग्लजचे सुनील बागी

पन्हाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात अव्वल

पन्हाळा (प्रतिनिधी ) : देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात पन्हाळा नगरपरिषदेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सलग पाच वेळेस पन्हाळा नगरपरिषदेचा दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत सन्मान होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिली. पन्हाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण- २०१८ पासून आपली कामगिरी उंचावत शहराचा नावलौकिक वाढवला आहे.… Continue reading पन्हाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात अव्वल

‘गोडसाखर’च्या कामगारांची देणी देण्याबाबत एकमत

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कै आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याची अर्थात ‘गोडसाखर’ ची वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोड झाली. होऊ घातलेल्या कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश सभासद असणाऱ्या कामगारांच्या ‘देणी’ या विषयाभोवतीच सभा फिरत राहिली आणि प्रत्येकाने ‘कारखाना कुणालाही चालवायला द्या, पण कामगारांची देणी आधी द्या’ हीच मागणी प्रामुख्याने केली. प्रशासक मंडळ अध्यक्ष तथा विभागीय उपनिबंधक… Continue reading ‘गोडसाखर’च्या कामगारांची देणी देण्याबाबत एकमत

महावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वीजग्राहक व महावितरण व्यवस्थापनाच्या संबंधात विश्वासार्हता वाढीस लागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्वाची आहे. महावितरणच्या मंचाकडूनही ग्राहकांना न्याय देण्याचे कार्य सतत घडत राहावे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर व रत्नागिरी परिमंडळाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचच्या नूतन व सुसज्ज सुनावणी कक्षाचे लोकार्पण भागवत यांच्या हस्ते झाले.… Continue reading महावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण

देशात पीएफआयवर ५ वर्षांची बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने ५ वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यदेश जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी, यांच्यासह विविध राज्यातील तपास… Continue reading देशात पीएफआयवर ५ वर्षांची बंदी

ग्रामसेवक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण इंगळे

धामोड (प्रतिनिधी) : येथील लक्ष्मण शंकर इंगळे यांची जिल्हा ग्रामसेवक संघाच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाली. ग्रामसेवक संघाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात तुळशी धामणी परिसराला हा पहिल्यादा मान मिळाला आहे. लक्ष्मण इंगळे यांनी गेली अनेक वर्षे राधानगरी तालुक्याचे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले आहे. या नूतन कार्यकारिणीच्या निवडीत जिल्हा सरचिटणीसपदी महेश खाडे, जिल्हा सहचिटणीस बी. एस. पाटील,… Continue reading ग्रामसेवक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण इंगळे

राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी)  महाराष्ट्र गृह विभागाच्या पोलीस शिपाई संवर्गातील २० हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देण्यात आली असून एकूण वीस हजार पदे भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस… Continue reading राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा निर्णय

कुरुंदवाडमध्ये रमाई योजनेच्या २८ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड शहरातील ४१ लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयाप्रमाणे एक कोटी अडीच लाख रुपयांच्या निधीची तरतूद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी करत पहिला टप्पा म्हणून २८ लाभार्थ्यांना सव्वा लाख रुपयाप्रमाणे ३५ लाखांचे धनादेश वितरित केले. प्रशासक तथा मुख्याधिकारी जाधव यांनी ऐन दसऱ्याच्या तोंडावर नागरिकांना घरकुलची गोड भेट देत धनादेश… Continue reading कुरुंदवाडमध्ये रमाई योजनेच्या २८ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

कागलचा जयसिंगराव तलाव कायमच तुडुंब भरणार : आ. मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव यापुढे कायमच तुडुंब भरून राहणार आहे. आपण केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे थेट काळम्मावाडी धरणाचे कालव्यातून आणलेले पाणी ६५ व्या किलोमीटरवर या तलावात मिसळणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलच्या ऐतिहासिक जयसिंगराव घाटगे तलावाच्या पाणी साठ्याची उंची एकूण २२ फूट आहे. तलावाच्या बाजूने जाणाऱ्या या… Continue reading कागलचा जयसिंगराव तलाव कायमच तुडुंब भरणार : आ. मुश्रीफ

राज्यात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान

मुंबई (प्रतिनिधी) : नवरात्री उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी करत महाराष्ट्रातील जनतेला नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर यंदा महाराष्ट्रात दहीहंडी आणि… Continue reading राज्यात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान

error: Content is protected !!