कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीचे पत्र शासनाचे अव्वर सचिव अ. का. लक्कस यांनी दिले आहे.

निखिल जाधव यांनी कुरुंदवाड येथे २०१९-२०, २०२१ या वर्षांमध्ये कोरोना, महापूर या काळात उल्लेखनीय कार्य केले होते. याचबरोबर शहराच्या स्वच्छतेत कुरुंदवाड शहराला मानांकन मिळवून दिले आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी निखिल जाधव यांनी महत्वपूर्ण काम केले आहे. अपंग बांधवांच्या विवाहासाठी २५ हजार रुपयांची मदत यासह विविध योजना अंमलात आणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी या कार्यकालामध्ये सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून कुरुंदवाड शहराचा विकास साधला आहे.