कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या अधिवेशनात कोल्हापुरच्या कॉम्रेड उज्ज्वला पाटील यांच्या सह महाराष्ट्रातील तिघींची आशा वर्कर आणि गट प्रवर्तक संघटनेच्या आँल इंडिया कमिटीवर निवड करण्यात आली.

कुरूक्षेत्र हरियाणा येथे आशावर्कर व गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना पहिल्या अधिवेशनात झाली. या अधिवेशनात अधिवेशनात देशभरातून २८६ प्रतिनिधी सहभागी होते. यामध्ये महाराष्ट्रातून पाच प्रतिनिधींचा सहभाग होता. यामध्ये आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना झाली. या परिषदेत ३७ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर कॉ.संगीता पाटील यांनी अभ्यास पूर्ण मत व्यक्त केले.

यावेळी किमान वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा आणि कामगार संघटनेच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा संकल्प करण्यात आला. दरम्यान या अधिवेशनात सिटू अंतर्गत ऑल इंडिया ची एक केंद्रीय कमिटी स्थापन झाली. त्यामध्ये ४५ सदस्यांची निवड करण्यात आली. या समितीमध्ये महाराष्ट्रातील कॉ पुष्पा पाटील (सोलापूर) यांची खजिनदार पदी, कॉ आनंदी अवघडे (सातारा) आणि कॉ. उज्वला पाटील (कोल्हापूर) यांची कौन्सिल पदी निवड करण्यात आली. सिटू चे केंद्रीय सचिव कॉ ए आर.सिंधू यांनी ही कमिटी जाहीर केल्याची माहिती संघटनेच्या राज्य सचिव कॉ संगिता पाटील यांनी दिली.