कोल्हापूर (प्रतिनिधी) : सदर बाजार येथील निंबाळकर चौक ते एसटी स्टँड मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. याप्रकरणी अशोक आदमाने (रा. भोसलेवाडी) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धनाजी चंद्रहार घाटे (वय ४४, रा. प्रतिभानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी घाटे हे आपल्या कारमधून निंबाळकर चौक ते एसटी स्टँड मार्गावरून जात होते. दरम्यान, अशोक आदमाने यांनी आपली कार निष्काळजीपणे चालवत समोरून आलेल्या घाटे यांच्या कारला धडक दिली. यामध्ये घाटे यांच्या कारचे १ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी फिर्याद घाटे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक आदमाने विरोधात गुन्हा दाखल केला आहे.