कागल (प्रतिनिधी) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह बोनसचा करार झाला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी संघटनामध्ये हा करार झाला. येत्या चार वर्षांसाठी झालेल्या या करारामध्ये भरघोस पगारवाढीसह दरवर्षी एक पगार बोनस देण्याचे निश्चित झाले. तसेच कर्मचाऱ्यांना सर्व अनुषंगिक सेवासुविधा व फायदे देण्याचेही करारामध्ये ठरले.

या करारामध्ये कंपनीकडे कायम सेवेत कार्यरत असलेल्या साडेसहाशेहून अधिक कामगारांचा समावेश आहे. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट हरीश चॅटर्जी, एचआर हेड प्रवीण गवळी, एचआर प्लांट हेड दीपक शिंदे, प्लांट हेड अरुण गोंदकर, जनरल मॅनेजर विकास राजा व संजय बोकारे आदी अधिकारी उपस्थित होते. रेमंड झांबायती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित पाटील, उपाध्यक्ष उत्तम डाफळे, उपाध्यक्ष अमोल पाटील, सरचिटणीस हृदयनाथ पाटील, नीलेश कडुकर, दीपक देसाई, संदीप पाटील, किरण माने, विनायक कुंभार, अमर पाटील, अतुल देसाई, रणजित पार्टे हे पदाधिकारी उपस्थित होते.