मुंबई  (प्रतिनिधी) : ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, त्यांनी माझ्यावर बोलू नये. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फो़डेन,  असा इशारा विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  यांनी  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांना  दिला आहे. आज (सोमवार) पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मलिक यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.

नवाब मलिकांनी ट्विटरवर भाजप आणि ड्रग्स पेडलर यांचं नातं,  असे नमूद करत  फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा जयदीप चंदूलाला राणा यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यावर  फडणवीस यांनी टीका केली आहे.

चार वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करून आरोप केले जात आहे. असे असेल, तर एनसीपी पार्टी ड्रग्स माफीया पार्टी झाली पाहिजे, असे म्हणायला हवे. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. आता त्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे त्याला अंतापर्यंत न्यावच लागेल,  असा इशारा फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे.