हुपरी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल, घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे देशातील सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आले आहे. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) जिल्हा शिवसेना आणि हुपरी शहर शिवसेनेच्या वतीने हुपरीतील स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनावेळी शिवसैनिकांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच ठिय्या मारून बोंब मारो आदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सात्ताप्पा भवान, तालुका संघटिका उषा चौगुले, विभाग प्रमुख विनायक विभूते, शहर प्रमुख अमोल देशपांडे, शहर संघटिका मीना जाधव, बाळासाहेब मुधाळे, नगरसेविका पुनम पाटील, भरत देसाई, अरूण गायकवाड, सागर खोत, भरत मेथे, शहाजी गायकवाड, यांच्यासह पंचक्रोशीतील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दरम्यान सहभागी