सावरवाडी (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे काल (शुक्रवार) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणीचे सदस्य के. एस. चौगुले यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी भाजपाचे करवीर तालुका अध्यक्ष हंबिरराव पाटील होते. यावेळी भाजपा शेतकरी आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष दादासाहेब देसाई, आझाद हिंद सेनेचे संस्थापक मुकुंद पाटील, भाजपा महिला आघाडीच्या कऱवीर तालुका अध्यक्षा डॉ. सुशिला पाटील, मराठा विकास संघटनेचे करवीर तालुका अध्यक्ष शिवाजीराव लोंढे , विवेक देसाई, पोपट मंडगे, तुकाराम चौगुले, बदाम यादव यांच्यासह शिरोली दुमाला भाजपा शाखा पदाधिकारी हजर होते. रक्तदान शिबीरात एकूण ४० युवकांनी सहभाग घेतला होता.