मुंबई : लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. भाजपकडून जळगावमध्ये विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून पक्षाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यांनतर खासदार उन्मेष पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. भाजप खासदार थेट मातोश्रीवर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर धरू लागला आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यातच विविध पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग देखील जोरात सुरु आहे. आता भाजपचा विद्यमान खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. उन्मेष पाटील यांना भाजपने जळगावमधून उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते लवकरच आपल्या पत्नीसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाकरे यांच्याकडून उन्मेष पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी?
भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे भाजप खासदार उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपचे नाराज उन्मेश पाटील पत्नीसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उन्मेश पाटील यांच्या पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे.

उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार?
भाजपने जळगावमधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर उन्मेश पाटील हे नाराज असल्याची चर्चा असून या संदर्भात ती आपली पुढील भूमिका जाहीर करतील, अशी माहिती आहे.

नाराज भाजप खासदार संजय राऊतांच्या भेटीला
उन्मेश पाटील यांनी भांडुपमधील संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी भेट घेतली. जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहित आहे. उन्मेश पाटील यांच्यासोबत पारोळाचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार राऊतांच्या भेटासाठी पोहोचले आहेत.

संपदा उन्मेश पाटील ठाकरे गटाच्या उमेदवार?
उन्मेश पाटील नाराज असून पत्नी संपदा यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता उन्मेश पाटील यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यानं चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. उन्मेश पाटील यांच्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देताना सांगितलं होतं की, ते आमच्या पक्षात प्रवेश करणार का नाही ते माहित नाही, पण त्यांनी वेळ मागितली आहे. आता या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, हे येत्या काही दिवसात समोर येईल.