मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यात  विधान परिषदेच्या  निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागपूर,  अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई  या  जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  अमल महाडिक, अमरीश पटेल,  वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना संधी देण्यात आली आहे.

कोल्हापूर – अमल महाडिक,  धुळे-नंदुरबार  – अमरीश पटेल,  नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे, अकोला-बुलडाणा-वाशिम – वसंत खंडेलवाल,  मुंबई – राजहंस सिंह यांना संधी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत डावलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना  नागपूर विधान परिषदेसाठी संधी देऊन राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे.

कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार  सतेज पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक यांना उमेदवारी देऊन भाजपने आव्हान उभे केले आहे. सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून  २०१५ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून  भाजपने  अमरीश पटेल यांना उमेदवारी देऊन सर्वच राजकीय पक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुंबईमधून राजहंस सिंह यांना संधी देण्यात आली आहे. अकोला-बुलडाणा-वाशिममधून वसंत खंडेलवाल आपले नशीब आजमावणार आहेत.