कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक, शैक्षणीक, कला, क्रीडा, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या आविष्कार फौंडेशन इंडिया संस्थेच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी भाग्यश्री पोवार  यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड ५ नोव्हेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ कालावधीकरता असून या निवडीचे पत्र संस्थेच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या मार्फत देण्यात आले. गेल्या अनेक वर्षातील सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत तसेच संस्थेच्या विस्तारवाढीसाठी भाग्यश्री पोवार यांची करवीर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाग्यश्री पोवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.