बँकेची कामे ३ दिवसांतच उरका, नाहीतर…

मुंबई  (प्रतिनिधी) : बँकेतील काही महत्त्वाची कामे पुढील ३ दिवसांमध्ये करून घ्या, अन्यथा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. कारण २७ मार्च ते ४  एप्रिलच्या कालावधीत बँका केवळ १ दिवसांसाठी सुरू राहणार आहेत. त्यामुळे या ३ दिवसांत बँकेची कामे उरकून घ्या. महिन्याच्या दुसर्‍या आणि शेवटच्या शनिवारी बँकांना सुट्ट्या आहेत. २७ तारखेला शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद… Continue reading बँकेची कामे ३ दिवसांतच उरका, नाहीतर…

गडहिंग्लज शिवसेना शहरप्रमुखपदी गडकरी की क्षीरसागर..?

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज शिवसेना शहरप्रमुख पदाची माळ गडकरी की क्षीरसागर यापैकी कोणाच्या गळ्यात पडणार ?  याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.  सध्या शहर प्रमुख पद रिक्त असून या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. काशिनाथ गडकरी सध्या शिवसेनेत उपशहर प्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवून सोडविण्यासाठी पुढाकार… Continue reading गडहिंग्लज शिवसेना शहरप्रमुखपदी गडकरी की क्षीरसागर..?

संजय राऊत इतके मोठे नेते नाहीयेत, की मी त्यांच्या…: देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत एवढे मोठे नेते नाहीयेत की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात?,  असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.… Continue reading संजय राऊत इतके मोठे नेते नाहीयेत, की मी त्यांच्या…: देवेंद्र फडणवीस

माळवाडी-तिरपण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

कोतोली (प्रतिनिधी)  : पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी माळवाडी ते तिरपण दरम्यानच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर नसल्याने सांडपाणी  रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.  तरी तातडीने या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटर काढून… Continue reading माळवाडी-तिरपण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

मूर्खांच्या नंदनवनात ‘बेवडा’ मारून फिरतायेत : शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करावे,  अशा पद्धतीचा गोंधळ या लोकांनी घातला. प्रश्न असा आहे की, हे सर्व लोक मूर्खांच्या नंदनवनात जणू ‘बेवडा’ मारून फिरत आहेत,  अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर तोफ डागली. पोलीस बदल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. यावर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पलटवार केला आहे. शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे… Continue reading मूर्खांच्या नंदनवनात ‘बेवडा’ मारून फिरतायेत : शिवसेनेची भाजपवर टीका

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ६५ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच १,०८९ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्ण – कोल्हापूर शहरातील २७, आजरा तालुक्यातील ४, भूदरगड तालुक्यातील १,चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ६५ जणांना लागण

प्रेमाचा ‘रंग’ ग्रामपंचायतीने केला ‘भंग’…

यड्राव (प्रतिनिधी) : प्रेमात कोणीही काहीही करू शकते, याची उदाहरणे आपण अनेकदा बघीतले आहे. असाच एक वेगळा प्रयोग शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे एका प्रियकरांने केला होता. ‘क्यूँ की’ या हिंदी चित्रपटाप्रमाणे धरणगुत्ती ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल अडीच कि.मी.  रस्त्यावर ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ असे ऑईलपेंटने असे लिखान केले होते. याचे वृत्त काल… Continue reading प्रेमाचा ‘रंग’ ग्रामपंचायतीने केला ‘भंग’…

कोल्हापूर जि. प. च्या अर्थसंकल्पावर विरोधकांची टिका (व्हिडिओ)

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सभापती प्रवीण यादव यांनी सांगितले, तर विरोधकांनी मात्र जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका केली.

मराठा आरक्षण मिळणे हीच आण्णासाहेबांना आदरांजली : वसंतराव मुळीक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी समाजाचे कै. आ. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड येथे कोल्हापूर जिल्हा माथाडी कामगार सहकारी संस्थेत वसंतराव मुळीक यांच्या हस्ते कै. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि जेष्ठ माथाडी कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण मिळणे हीच खरी आण्णासाहेबांना आदरांजली असेल, असे प्रतिपादन मराठा… Continue reading मराठा आरक्षण मिळणे हीच आण्णासाहेबांना आदरांजली : वसंतराव मुळीक

इचलकरंजीत जलवाहिनीला गळती : रस्त्यावरती वीस फुटांचा कारंजा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या आणि गळतीमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला इचलकरंजी-टाकवडे मार्गावर व्हॉल्वलाच गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हा व्हॉल्व तुटल्याने रस्त्यावरती सुमारे २० फुटांचा कारंजा उडत होता. यामुळे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. सध्या उन्हाळा सुरु असून त्यातच टाकवडे वेस… Continue reading इचलकरंजीत जलवाहिनीला गळती : रस्त्यावरती वीस फुटांचा कारंजा

error: Content is protected !!