अखेर गोकुळ निवडणुकीची तारीख ठरली..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जिल्हाचे राजकारण, अर्थकारण अवलंबून असणाऱ्या गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २ मे २०२१ रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याची घोषणा… Continue reading अखेर गोकुळ निवडणुकीची तारीख ठरली..!

आर. के. नगरातील बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील आर.के.नगर येथील बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी आज (मंगळवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन उपजिल्हा प्रमुख महिला संघटीका स्मिता सावंत आणि शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील उपनगरामध्ये चोरी, मारामारीसह विविध प्रकारच्या घटना घडत… Continue reading आर. के. नगरातील बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी : शिवसेनेची मागणी

करवीर कामगार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेची इचलकरंजी शहरात अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी आज (मंगळवार) करवीर कामगार (आयटक) संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी इचलकरंजी शहरातील नागरिकांना शहापूर येथे घरकुलासाठी गट नं. ४६८ जागेला मंजूरी मिळावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु, त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेची… Continue reading करवीर कामगार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

शिवाजी विद्यापीठ परिसरात मधमाशांचा नागरीकांना त्रास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ परिसरात झाडांवर मधमाशांची अनेक पोळी आहेत. या पोळ्यातील मध खाण्यासाठी काही पक्षी या पोळ्यांकडे येतात. त्यामुळे मधमाशा चवताळून या परिसरात फिरायला येणाऱ्या लोकांना चावतात. आजही काहीजणांना मधमाशा चावल्या. प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी नागरीकांतून व्यक्त होत आहे. विद्यपीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या झाडांवर मधमाशांची अनेक… Continue reading शिवाजी विद्यापीठ परिसरात मधमाशांचा नागरीकांना त्रास…

कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळू-लॉकडाऊन टाळू : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आज (मंगळवार) बैठक घेण्यात आली. यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सर्व संलग्न संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न… Continue reading कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळू-लॉकडाऊन टाळू : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयाला शहीद दिनाचा विसर : भाजपकडून अधिकारी धारेवर

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पुरवठा कार्यालयाला शहीद दिनाचा विसर पडल्याचे आज दिसून आले. त्यामुळे याची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा कार्यालय आवाराची स्वच्छता करुन शहीद स्तंभाचे पूजन करून अभिवादन केले. दरम्यान, शहीद दिन साजरा न केल्याबद्दलचा जाब भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा निरीक्षक अधिकारी अमित डोंगरे यांना विचारून धारेवर धरले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली.… Continue reading इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयाला शहीद दिनाचा विसर : भाजपकडून अधिकारी धारेवर

इचलकरंजीत बेकायदेशीर फलक लावणाऱ्याविरोधात कारवाईची मागणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमानिमित्त बेकायदेशीर फलक लावले जात आहेत. यातून शहरात गँगवॉर भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्षा अलका स्वामी व प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांना निवेदन… Continue reading इचलकरंजीत बेकायदेशीर फलक लावणाऱ्याविरोधात कारवाईची मागणी

पं.स. सभापतींना १ कोटींचा निधी द्या : मंत्री मुश्रीफांना साकडे

कागल (प्रतिनिधी) : ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यभरातील पंचायत समित्यांना १५ व्या वित्त आयोगातून १० टक्के निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निधी कमी असल्याने कोणतीही भरीव कामे करता येत नाहीत. त्यामुळे पंचायत समित्यांच्या सभापतीना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली… Continue reading पं.स. सभापतींना १ कोटींचा निधी द्या : मंत्री मुश्रीफांना साकडे

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये भाजपाची निदर्शने…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. असा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राज्याची सगळीकडे बदनामी झाली असून गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी गडहिंग्लज भाजपने केली आहे. तसेच यावेळी गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली. गृहमंत्री अनिल देशमुख… Continue reading गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये भाजपाची निदर्शने…

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल : अनिल देशमुखांचे गृहखाते जाणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून अनिल देशमुख यांचे गृहखाते काढून घेतले… Continue reading राज्य मंत्रिमंडळात फेरबदल : अनिल देशमुखांचे गृहखाते जाणार ?

error: Content is protected !!