भुईबावडा घाटात कोसळली दरड : वाहतूक ठप्प

साळवण (प्रतिनीधी) : गगनबावडा तालुक्यातील भुईबावडा घाटामध्ये आज दरडीचा मोठा भाग कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे गगनबावडा- भूईबावडा-खारेपाटणला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. तर मार्गावर पडलेले मुरमाचे आणि मातीचे ढीग काढण्याचे काम सुरू आहे. तर या मार्गावरून होणारी वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी करुळ घाटातील संरक्षण कठडा कोसळल्याने गगनबावडा- वैभववाडी मार्ग… Continue reading भुईबावडा घाटात कोसळली दरड : वाहतूक ठप्प

खुपिरेच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय साहित्याचे वाटप

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गावातील गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. एन. मगदूम होत्या. प्रमुख पाहुण्या सरपंच दीपाली जांभळे, उपसरपंच युवराज पाटील, पोलीस पाटील सविता गुरव, गावातील सर्व संस्था, सोसायटी, दूध संस्था यांचे पदाधिकारी, सदस्य… Continue reading खुपिरेच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय साहित्याचे वाटप

धामणी खोऱ्यातील काही गावांना बेटाचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत

कळे (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम पन्हाळा परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुंभी, धामणी, सरस्वती नद्यांचे पाणीपात्राबाहेर पडून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अणदूर, कोदे, वेसरफ लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. कोल्हापूर-गगनबावडा मार्ग व कोल्हापूर-अणुस्कुरा मार्गावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद होती, ती आता पूर्ववत सुरू झाली आहे. अद्यापही काही ठिकाणी रस्त्यालगत पाणी… Continue reading धामणी खोऱ्यातील काही गावांना बेटाचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत

‘डी. वाय.’हॉस्पिटलमध्ये वर्षभर मोफत आरोग्य सुविधा देणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वर्षभर मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याची घोषणा डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या ३३  व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील होते. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने… Continue reading ‘डी. वाय.’हॉस्पिटलमध्ये वर्षभर मोफत आरोग्य सुविधा देणार

कुंभोज येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली

कुंभोज (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी आज कुंभोज-नेज येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. बाहुबली विद्यापीठच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अनेक विद्यार्थी तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. रॅलीत देशभक्तीपर घोषणा देण्यात… Continue reading कुंभोज येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली

कुंभोज ग्रा.पं. ला ‘जवाहर’च्या वतीने ११०० ध्वज प्रदान

कुंभोज (प्रतिनिधी) : ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या वतीने व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी कुंभोज ग्रामपंचायतीकडे अकराशे ध्वज वाटपासाठी सुपूर्द केले. कुंभोज येथे हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहाने यशस्वी करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला होता. त्या अनुषंगाने ग्रा.पं. ने  वेगवेगळ्या माध्यमातून ध्वज निधी व ध्वज संकलन केले होते.… Continue reading कुंभोज ग्रा.पं. ला ‘जवाहर’च्या वतीने ११०० ध्वज प्रदान

किणी टोल नाका बंदसाठी मनसेचे अनोखे आंदोलन

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : किणी टोल नाका बंद करा या मागणीसाठी मनसेच्या वतीने केंद्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयावर आज (शुक्रवारी) अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. हातात पैशाचे खोके आणि पैशाचे तोरण घेऊन मनसेचे कार्यकर्ते वाजत गाजत कार्यालयावर आले आणि जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. गेले १७ वर्षे किणी टोल नाका ठेकेदाराच्या ताब्यात आहे. शासनाने बांधा… Continue reading किणी टोल नाका बंदसाठी मनसेचे अनोखे आंदोलन

मंत्री चंद्रकांत पाटील, केसरकर आज रात्री कोल्हापुरात

कोल्हापूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री दीपक केसरकर हे दोघे आज (शुक्रवारी) रात्री कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. केसरकर यांचे रात्री ८ वाजता सर्कीट हाऊस येथे आगमन होणार असून, ते रात्री ९ वाजता अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते रात्री ९.३० वाजता डॉ. बिपीनचंद्र परीख यांच्या घरी भेट देणार आहेत. रात्री दहानंतर… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील, केसरकर आज रात्री कोल्हापुरात

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद देण्यात आल्याने ही जबाबदारी बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, तर आमदार आशीष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.… Continue reading भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

सायबर गुन्ह्याबाबत  जनजागृतीसाठी चित्ररथ, पथनाट्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आर्थिक फसवणूक व अन्य सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने चित्ररथ व पथनाट्याचे अनावरण आज (शुक्रवारी) पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. चित्ररथ व पथनाट्याचे अनावरण व अपर अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय प्रिया पाटील, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे… Continue reading सायबर गुन्ह्याबाबत  जनजागृतीसाठी चित्ररथ, पथनाट्य

error: Content is protected !!