कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेमधून आजपर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून किती लोकांना कर्ज प्रकरणे वाटप करण्यात आली, किती कर्जदारांचे मागणी अर्ज आले आहेत व पेंडिंग प्रकरणे कोणत्या कारणाने मागे ठेवली आहेत; याची माहिती मिळावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

यावेळी संदीप शेलार, बँक निरीक्षक कुमार पराले यांना कुदळे, सोन्या चौगुले, धनाजी माने, मनसेचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष अमर बचाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. बँकेकडून वेळेत माहिती न मिळाल्यास मनसेच्या पद्धतीने माहिती मिळवून पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशारा बचाटे यांनी दिला आहे.