‘स्तुति’ प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींसाठी पन्हाळा सहल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी दोन मार्गदर्शनपर व्याख्यानानंतर सहभागींना किल्ले पन्हाळाची शैक्षणिक सहल घडविण्यात आली. पहिल्या सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. राजाराम माने यांनी ‘नॅनोस्ट्रक्चर आणि त्यांचे उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. राजेंद्र सोनकवडे यांनी प्रा. माने यांचा सत्कार केला. दुसऱ्या सत्रात शिवाजी… Continue reading ‘स्तुति’ प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींसाठी पन्हाळा सहल

शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार : ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. आज मुंबईतील विभाग प्रमुखाशी बैठक घेत आगामी दसरा मेळाव्यावर ठाकरे यांनी चर्चा केली. विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवेसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत येतात. मात्र यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा… Continue reading शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार : ठाकरे

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत यशोमती ठाकूर, सतेज पाटील, सुनील केदार

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीप्रमाणेच राज्याच्या संघटनेतही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजीमंत्री यशोमती ठाकूर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि माजी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणूक घेण्यात… Continue reading काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत यशोमती ठाकूर, सतेज पाटील, सुनील केदार

कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोल्हापूरच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून… Continue reading कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

अपयशाचे खापर ‘मविआ’ सरकारवर फोडले : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या अपयशाचे खापर शिंदे-फडणवीस आमच्यावर फोडत आहेत; मात्र आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून खूप प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यावर ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया… Continue reading अपयशाचे खापर ‘मविआ’ सरकारवर फोडले : उद्धव ठाकरे

‘त्या’ मुलींचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वीकारले पालकत्व

मुंबई (प्रतिनिधी) : उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील  यांचा काम करीत असताना पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बळीराजाच्या चार मुलींचे काय होणार, या चिंतेत असलेल्या कुटुंबाच्या आणि त्या मुलींच्या मदतीला आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे देवासारखे धावून गेले. ‘त्या’ मुलींचे संपूर्ण पालकत्व घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर… Continue reading ‘त्या’ मुलींचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वीकारले पालकत्व

शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.… Continue reading शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

कोल्हापूरच्या कविता चावला ठरल्या करोडपतीच्या मानकरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या सिझनच्या पहिल्या करोडपती होण्याच्या मानकरी गांधीनगरमधील गृहिणी कविता चावला या ठरल्या आहेत. गांधीनगरच्या कविता चावला यांनी केबीसीमध्ये एकापाठोपाठ एक बिनचूक उत्तरे देत १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले. मोठ्या महत्प्रयासाने त्यांनी हॉटसीटवर बसण्याचा बहुमान मिळवला. ‘कोल्हापुरी जगात लय भारी’ या घोषणांमुळे मला खुप प्रोत्साहन मिळाल्याचेही… Continue reading कोल्हापूरच्या कविता चावला ठरल्या करोडपतीच्या मानकरी

वालावलकर हॉस्पिटलतर्फे आरोग्य, नेत्र शिबिर संयोजनाची तयारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) आगामी नवरात्र उत्सव आणि दिवाळी दरम्यान ठिकठिकाणी होणाऱ्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरचे संयोजन करण्यास शिवाजी उद्यमनगरमधील श्री पंत वालावलकर हॉस्पिटल तयार आहे. अशा प्रकारचे शिबिर भरवणाऱ्या तरुण मंडळे, तालीम संस्था, महिला बचत गट, दांडिया समूह यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन, वालावलकर हॉस्पिटलचे प्रमुख संचालक संतोष कुलकर्णी यांनी केले आहे. या शिबिरामधून… Continue reading वालावलकर हॉस्पिटलतर्फे आरोग्य, नेत्र शिबिर संयोजनाची तयारी

सांगलीतील शैक्षणिक अधिवेशनाचे राजू शेट्टी यांना निमंत्रण

शिरोळ (प्रतिनिधी) :सांगली येथे होणाऱ्या शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण माजी खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आले आहे. महामंडळाच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एन. डी. बिरनाळे, प्रा. एम. एस. रजपूत व विनोद पाटोळे यांनी शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन हे निमंत्रण दिले. शिक्षण संस्थांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी… Continue reading सांगलीतील शैक्षणिक अधिवेशनाचे राजू शेट्टी यांना निमंत्रण

error: Content is protected !!