पुणे पदवीधर निवडणूक : भाजपकडून संग्राम देशमुख रिंगणात

मुंबई,  (प्रतिनिधी ) : राज्यातील  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नांवे आज (सोमवार) जाहीर केली आहेत. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी  दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या… Continue reading पुणे पदवीधर निवडणूक : भाजपकडून संग्राम देशमुख रिंगणात

अर्णब गोस्वामींच्या  केसाला धक्का लागला तर…; भाजप आमदाराचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार असेल, असे  भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी ट्विट करुन म्हटले आहे. राम कदम यांनी अर्णब गोस्वामी याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाण्याची तयारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदम यांनी महाविकास आघाडी… Continue reading अर्णब गोस्वामींच्या  केसाला धक्का लागला तर…; भाजप आमदाराचा इशारा

पगार न मिळाल्याने एसटी बस चालकाची आत्महत्या

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी एसटी डेपोतील बस चालक पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. यावर तोडगा न निघाल्यामुळे चालकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिवाळीच्या  तोंडावर कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.… Continue reading पगार न मिळाल्याने एसटी बस चालकाची आत्महत्या

बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी झाली, तर दिवाळीही फटाक्यांशिवाय साजरी करू..!    

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या वर्षी बकऱ्यांशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल त्याच वर्षी फटक्यांशिवाय दिवाळी साजरी केली जाईल. जर देशामध्ये बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी झाली तर दिवाळीमध्येही फटाके फोडले जाणार नाही,  असे उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे. या… Continue reading बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी झाली, तर दिवाळीही फटाक्यांशिवाय साजरी करू..!    

कोल्हापूरातील महाद्वार रोडवर चोरट्यांचा धुमाकूळ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात असणाऱ्या महाद्वार रोडवर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी हात साफ करायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत दोन महिलांना याचा फटका बसला आहे. या दोन्ही घटनेत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी महाद्वार रोडवर गर्दी होत आहे. या… Continue reading कोल्हापूरातील महाद्वार रोडवर चोरट्यांचा धुमाकूळ…

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ४६ कोरोनामुक्त : तर ४० जण कोरोनाबाधित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५८६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ४६ कोरोनामुक्त : तर ४० जण कोरोनाबाधित

गांधीनगर येथे खोटी विमा पॉलिसी देवून फसवणूक : एकावर गुन्हा

गांधीनगर (प्रतिनिधी) : पुणे येथील गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीची बनावट पॉलिसी देऊन फसवणूक केली. याप्रकरणी गांधीनगर मेनरोडवरील निगडेवाडी येथील अथर्व बजाज ऑटो शोरूमचे शरद कलगोंडा पाटील यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अथर्व बजाज ऑटो शोरूम निगडेवाडी मधून १६/११/२०१९ रोजी सिद्धार्थ राकेश गर्ग (रा. बेळगाव) यांनी… Continue reading गांधीनगर येथे खोटी विमा पॉलिसी देवून फसवणूक : एकावर गुन्हा

महे येथे पिंजराला आग : दहा हजारांचे नुकसान

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथे अनिल तुकाराम नवाळे यांच्या पिंजराच्या व्हळीला आग लागल्याने सुमारे दहा हजारांचे  नुकसान झाले. ही पिंजर गावडे पाणंदीमध्ये ठेवले होते. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे.

महामंडळासह १३ ठराव मंजूर..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील हॉटेल पॅव्हेलियनमधील राज्यस्तरीय ब्राह्मण गोलमेज परिषदेत ब्राह्मण समाजाला आर्थिक महामंडळ देण्यासह १३ ठराव मंजूर करण्यात आले आहेत. निखिल लातूरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ब्रह्ममित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला. परिषदेत काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिल्याचे सांगितले. ब्राह्मण… Continue reading महामंडळासह १३ ठराव मंजूर..

‘त्या’ बेपत्ता माय-लेकींची पंचगंगेत आत्महत्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  काल (शनिवार) पासून बेपत्ता असलेल्या माय लेकींचा पंचगंगा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३२), खुशी सावळकर (वय १०) आणि श्रीशा सावळकर (वय ७) सर्व राहणार वडणगे अशी मृत्यू झाल्याची नावे आहेत. आज (रविवारी) ही घटना उघडकीस आली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी… Continue reading ‘त्या’ बेपत्ता माय-लेकींची पंचगंगेत आत्महत्या…

error: Content is protected !!