ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात विशेष वाढ : जयश्री गाट

हुपरी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील नगरपरिषदेच्या ग्रामपंचायत कालीन कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात विशेष वाढीव राहणीमान भत्ता लागू तसेच कोरोनाकाळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिपावली पूर्वी स्वानुग्रह अनुदान देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी दिली. हुपरी नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर तांत्रिक व शैक्षणिक अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांचे विभागीय आयुक्त,पुणे यांच्या आदेशानुसार समावेशन झाले. तथापि उर्वरित समावेशन न… Continue reading ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात विशेष वाढ : जयश्री गाट

 ‘यावरून’ संभाजीराजेंनी विचारला सरकारला जाब

नांदेड (प्रतिनिधी) : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारला आहे. शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले. केवळ मराठ्यांना दिले नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. ते नांदेडमध्ये एका सभेत बोलत… Continue reading  ‘यावरून’ संभाजीराजेंनी विचारला सरकारला जाब

‘श्रीक्षात्र जगतगुरुपीठा’च्या विविध उपक्रमांना ११ नोव्हेंबरपासून प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ११ नोव्हेंबर १९२० रोजी श्रीक्षात्र जगतगुरुपीठाची स्थापना केली. या घटनेस १०० वर्षे पूर्ण होत असून ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची अन अभिमानाची गोष्ट. यानिमित्त श्री क्षात्र जगतगुरु पीठ, पाटगांव यांच्या माध्यमातून हे वर्ष अनेक समाजाभिमूख उपक्रमांनी साजरे करण्याचे ठरविले आहे. ११ नोव्हेंबर रोजी छ. शाहू महाराज यांच्या हस्ते या… Continue reading ‘श्रीक्षात्र जगतगुरुपीठा’च्या विविध उपक्रमांना ११ नोव्हेंबरपासून प्रारंभ

महापालिकेसंबंधित ‘या’ प्रश्नावर मंत्रालयात बैठक घ्या : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : थेट पाईपलाईनव्दारे शहराला पाणीपुरवठा करणे यासह विविध तीन विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी नगरविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व विभागांची मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून विविध प्रश्न मार्गी लावावेत, असे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी थेट पाईप… Continue reading महापालिकेसंबंधित ‘या’ प्रश्नावर मंत्रालयात बैठक घ्या : राजेश क्षीरसागर

मानव कल्याणकारी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी नितीन सणगर

टोप (प्रतिनिधी) : पेठवडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन सणगर यांची कोल्हापूर मानव कल्याणकारी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. साहिल मुजावर (मलकापूरकर) यांच्या प्रयत्नाने व सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज (रविवार) त्यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सलिम पटेल यांनी दिले. निवडीचे पत्र साहिल मुजावर यांच्या हस्ते देताना जीवन सुतार, सचिन… Continue reading मानव कल्याणकारी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी नितीन सणगर

महाविकास आघाडीत बिघाडी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिका निवडणुकीत आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेनेने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे येथे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परिणामी शहरातील सर्वच ८१ वार्डात उमेदवारांची संख्या वाढणार असल्याने लढतही रंगतदार होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपणार आहे. आता सभागृहाला केवळ सात दिवस… Continue reading महाविकास आघाडीत बिघाडी..!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराचे वासे फिरले : आता बायकोही साथ सोडणार..?

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या अटीतटी आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत जो बायडेन यांनी दणदणीत विजय संपादन केला. हा पराभव माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होताना डोनाल्ड ट्रम्प यांना कौटुंबिक पातळीवर दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.    डोनाल्ड ट्रम्प यांची… Continue reading डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराचे वासे फिरले : आता बायकोही साथ सोडणार..?

‘तो’ पंतप्रधानांनी रचलेला कट : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटबंदीला चार वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘नोटबंदी’ हा पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता. तसेच राष्ट्रीय शोकांतिकेला चार वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुम्हीही आवाज बुलंद करा, असे आवाहन देशातील जनतेलाही केले आहे.… Continue reading ‘तो’ पंतप्रधानांनी रचलेला कट : राहुल गांधी

पदवीधरच्या निवडणुकीसंबंधी ‘त्यांनी’ घेतला मोठा निर्णय

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील नेट, सेट, पीएचडी धारकांनी मतदानाविरोधात एल्गार पुकारला आहे. या निवडणुकीत सर्व प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता थेट नोटाला मतदान करणार असल्याचे नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने जाहीर केले आहे. मागील दहा वर्षांत पदवीधर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यात पदवीधर… Continue reading पदवीधरच्या निवडणुकीसंबंधी ‘त्यांनी’ घेतला मोठा निर्णय

…तर २३ नोव्हेंबरला आत्मदहन करू : मौजे वडगाव ग्रामस्थांचा इशारा

टोप (प्रतिनिधी) : मौजेवडगांव ग्रामपंचायत आणि गेल इंडिया यांच्यात झालेल्या करारानुसार गावठाण ते पाझर तलावापर्यंतच्या रस्त्यासाठी गेल इंडिया कंपनीने ३ कोटी १७ लाखांची निधी दिला आहे. त्यापैकी १ कोटी २० लाख रुपये कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे एक वर्षापूर्वी वर्ग केले आहेत. परंतु या रस्त्याच्या कामात काही लोकप्रतिनिधीनी खोडा घातल्याने हे काम अद्याप सुरू झालेले नाही. तरी… Continue reading …तर २३ नोव्हेंबरला आत्मदहन करू : मौजे वडगाव ग्रामस्थांचा इशारा

error: Content is protected !!