गडहिंग्लज शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी निवडी…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गडहिंग्लज दौऱ्यावर आले आहेत. यावेळी गडहिंग्लज शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी ना. मुश्रीफ यांच्या हस्ते महिलांना आज (शनिवार) निवडीच्या पत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सुनिता नाईक (गडहिंग्लज शहर कार्याध्यक्ष), उर्मिला जोशी (शहर उपाध्यक्ष),  अश्विनी मगदूम (शहर उपाध्यक्ष), रेश्मा कांबळे (शहर उपाध्यक्ष), अरुणा कोलते… Continue reading गडहिंग्लज शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी निवडी…

रोहित शर्माच्या चुकीमुळे भारताचे पाच खेळाडू क्वारंटाईन   

मेलबर्न (वृत्तसंस्था) : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हॉटेलमध्ये जेवण केल्याने टीम इंडियाचे पाच खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता आहे. याची चौकशी बीसीसीआयने सुरू केली आहे. या पाचही खेळाडूंचे हॉटेलमध्ये जेवतानाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या… Continue reading रोहित शर्माच्या चुकीमुळे भारताचे पाच खेळाडू क्वारंटाईन   

तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का..? : राम कदम

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजप-शिवसेना यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपसोबत सत्तेत असताना नामांतरचा प्रस्ताव का पाठवला नाहीत?  असा सवाल करत तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का ? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. कदम म्हणाले की, भाजपसोबत पाच वर्षे शिवसेना सत्तेत असताना औरंगाबादच्या… Continue reading तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का..? : राम कदम

२६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधाराला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांना मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी २६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी जकीउर रहमान लखवी याला आज (शनिवार) अटक करण्यात आली. पाकिस्तानातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जकीउर रहमान लखवीने हाफीज सईदसोबत मिळून २६/११ च्या हल्ल्याचा कट आखला होता.   लखवीला मुंबई हल्ल्यानंतर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे जागतिक दहशतवादी… Continue reading २६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधाराला अटक

करवीर मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावू : राहुल पाटील   

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. जिल्ह्याचे नेते व आमदार पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांनी दिली. करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे आमदार पी.एन.पाटील यांच्या फंडातून १३ लाख ७५ हजार रूपये मंजूर झालेल्या रस्ते कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत… Continue reading करवीर मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावू : राहुल पाटील   

कोरोना प्रतिबंधक लसीवरून अखिलेश यादव यांनी तोडले तारे…

लखनौ (वृत्तसंस्था) : मागील वर्षी कोरोनामुळे देशात भयंकर परिस्थिती उद्भवली. लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकीकडे देशातील कोट्यवधी नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा करत असताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपने तयार केलेल्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू ? असा सवाल त्यांनी केला… Continue reading कोरोना प्रतिबंधक लसीवरून अखिलेश यादव यांनी तोडले तारे…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बुटा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज (शनिवार) त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते.… Continue reading काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बुटा सिंग यांचे निधन

कोरोना लस मोफत मिळणार ? : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे घुमजाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यू टर्न घेत सर्वांना लस मोफत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. पहिल्या टप्प्यातच लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल खुलासा केला आहे. त्यामुळे देशवासीयांचा हिरमोड झाला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून… Continue reading कोरोना लस मोफत मिळणार ? : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे घुमजाव

भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ला हृदयविकाराचा झटका

कोलकाता (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आज सायंकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. या वृत्तानंतर सौरव यांच्या चाहत्यांसह क्रिकेट रसिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या… Continue reading भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ला हृदयविकाराचा झटका

अखिल भारतीय हिंदू महासभा, कोल्हापूरच्या अध्यक्षपदी संदीप सासने…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय हिंदू महासभा, कोल्हापूरच्या अध्यक्षपदी संदीप सासने यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष निरंजन दिक्षीत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी नागेश साठे, आरती दिक्षीत, रणवीर संकपाळ, श्रद्धा खोखराळे, सुवर्णा पवार, मारुती मिरजकर, सरीता भंडारी, राम लिमकर उपस्थित होते.

error: Content is protected !!