सुगंधी गुटख्याचा साठा व विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टाकाळा येथील माळी कॉलनी व कळंबा येथील दादू चौगुलेनगर येथे सुगंधी गुटख्याचा साठा व विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. सखाराम श्रीपती सावंत (वय ३१, रा. माले कॉलनी, टाकळा) संतोष अण्णाप्पा कुंभार (वय ३०, रा. दादू चौगुलेनगर, कळंबा) अशी त्यांची नावे आहेत.  त्याच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा गुटखा पानमसाला व सुगंधी… Continue reading सुगंधी गुटख्याचा साठा व विक्री करणाऱ्या दोघांना अटक

यंदा ग्रा.पं.निवडणुकीत सफरचंद, हिरवी मिरची, कंगवा, पांगुळगाड्याची हवा   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निवडणूक मग ती कोणतीही असली तरी महत्त्व असते ते निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या चिन्हाला. प्रत्येक उमेदवार पक्षाचे चिन्ह नसेल तर आपल्या पसंतीचे चिन्ह मिळावे यासाठी धडपडत असतो. पण यावेळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मजेशीर चिन्हे आयोगाने दिली आहेत. त्याची ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे. पाव, ब्रेड, सफरचंद, भाज्या, नेलकटर, कंगवा अशा एक ना अनेक… Continue reading यंदा ग्रा.पं.निवडणुकीत सफरचंद, हिरवी मिरची, कंगवा, पांगुळगाड्याची हवा   

आताही केंद्राकडे बोट करू नका : दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये  राजकीय कलगीतुरा रंगला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने या नामांतराला विरोध केला आहे. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.    औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करणे, हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट केंद्र… Continue reading आताही केंद्राकडे बोट करू नका : दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

पणुंत्रे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पणुंत्रे येथील महिलांनी प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली. प्रथम फोटोपूजन व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त काही मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रियांका माने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देत सध्याच्या परिस्थितीत महिलांनी कसे जगायला पाहिजे याविषयी… Continue reading पणुंत्रे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘यांच्या’ नावांची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याजागी तरूण नेत्याची निवड कऱण्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. त्यासाठी  खासदार राजीव सातव,  मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री सुनील केदार आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र व मंत्री अमित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. पण यावर… Continue reading महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘यांच्या’ नावांची चर्चा

…तर मी राजीनामा देणार : खा. सुजय विखे-पाटील

अहमदनगर  (प्रतिनिधी) :  राहुरीतील डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभाराबाबत भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. कारखान्याचा पुढील ७२  तासांत कारभार सुधारला नाही, तर आपण संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशा इशारा  खासदार विखे यांनी दिला आहे. कारखान्याला भेट देऊन विखे यांनी प्रशासनाची खरडपट्टी काढली. दरम्यान, बॉयलरमध्ये साखरेची पोती आढळून आल्याने… Continue reading …तर मी राजीनामा देणार : खा. सुजय विखे-पाटील

…तर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढू : शेतकऱ्यांचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करून शेतमालाच्या आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर तरतूद करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.  याबाबत सोमवारी (दि.४) होणारी चर्चा निष्फळ ठरली, तर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी आंदोलकांनी दिला आहे. याबाबत शेतकरी नेते दर्शनपाल सिंग आणि अभिमन्यू कोहार यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची भूमिका… Continue reading …तर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढू : शेतकऱ्यांचा इशारा

रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेवर शिक्षक संघटनांचा मूक मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी श्रीधर सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्थ आज (शनिवार) शहर व जिल्हा नागरी कृती व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने जय भारत शिक्षक संस्थेवर मूक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जय भारत… Continue reading रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेवर शिक्षक संघटनांचा मूक मोर्चा

कोल्हापुरी ठसका : कालचा गोंधळ बरा होता असं नको व्हायला…

महापालिका निवडणूक जाहीर झाली की इच्छुक जनतेपुढे फारच नम्र होतात. इतके की, नम्रतेचे जणू आदर्शच… निकाल लागल्यावर मात्र नम्रतेचा उसना मुखवटा गळून पडतो. अर्थात, अगदी हाताच्या बोटाच्या मोजण्याइतकेच याला अपवाद असतात. सभागृहात आले की त्यांचे वर्तन, भाषा बदलते, असा अनुभव आहे. वास्तविक, मागील काही वर्षांपासून अशी परिस्थिती आहे. किंबहुना आणखीनच बिघडत चालली आहे. सर्वांनी याचा… Continue reading कोल्हापुरी ठसका : कालचा गोंधळ बरा होता असं नको व्हायला…

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १,१६३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ५, कागल तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण –… Continue reading जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण…

error: Content is protected !!