कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ मृत्यू झाले असून ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १२, आजरा – ०, भुदरगड – १, चंदगड – ०, गडहिंग्लज – ४, गगनबावडा – १, हातकणंगले – ३, कागल – ०, करवीर – ३, पन्हाळा – ०, राधानगरी – १, शाहूवाडी – २, शिरोळ – १, नगरपरिषद क्षेत्र – ४ इतर जिल्हा व राज्यातील – ३ अशा ३५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –
एकूण रुग्ण – २, ०६, ०१०
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९९, ७७०
मृतांची संख्या – ५, ७७३
उपचार सुरू असलेले रुग्ण – ४६७