कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर आणि अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आमदार जाधव यांनी शहरातील शिक्षण संस्था आणि शाळांना भेटी दिल्या. तसेच शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी शिक्षकांनी विविध समस्या आमदार जाधव यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रा. आसगावकर आणि लाड यांना विधान परीषदेत पाठवा, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.

आमदार जाधव यांनी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डीग – न्यु कॉलेज,  महाराष्ट्र हायस्कूल व ज्यु. कॉलेज, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एस. एम. लोहीया हायस्कूल, इंदुमती गर्ल्स हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, एम. एल. जी. हायस्कूलमध्ये भेट दिली.

यावेळी माजी उपमहापौर विक्रम जरग, युथ कॉग्रेस अध्यक्ष दिपक थोरात, उत्तर विधानसभा मतदार संघ युथ कॉग्रेस अध्यक्ष विनायक पाटील, अक्षय शेळके, अमित पोवार, नरेंद्र पायमल आदी उपस्थित होते.