कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. दत्तात्रय घुगरे, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग हळदकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेचे निवडणूक शिक्षक नेते दादासाहेब लाड विरुद्ध आमदार जयंत आसगावकर या नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पॅनेलमध्ये झाली होती; परंतु दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीने निवडणुकीत सर्व २१ जागा जिंकत ‘कोजिमाशि’मध्ये चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले.

अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे व प्राचार्य दत्तात्रय घुगरे इच्छुक होते. यामध्ये दत्तात्रय घुगरे यांनी बाजी मारली. घुगरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध झाली. निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सभासदांनी स्वाभिमानी सत्तारूढ आघाडीवर विश्वास ठेवून ही सत्ता चौथ्यांदा दिल्याबद्दल सर्वच संचालक व पदाधिकाऱ्यांनी सभासदांचे आभार मानून आदर्श, पारदर्शी कारभार करण्याची ग्वाही दिली.