कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांनी देखील अंतर्गत हालचाली सुरु केल्या आहेत. नुकतीच भारतीय जनता पक्षाने राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा निर्वाळा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी कोल्हापूरच्या दोन्ही जागा उद्धवसेनेच्या पदरात पडणार असल्याची माहिती दिली आहे.

कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये बुधवारी दुपारी उद्धवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूरच्या जागेबाबत येणाऱ्या बातम्यांवर जावू नका. मला उध्दव ठाकरे म्हणाले, कोल्हापूरबद्दल माझ्याकडे रिपोर्ट वेगळा येतोय. तेव्हा मीच त्यांना म्हणालो, मी प्रत्यक्ष कोल्हापूरला जावून येतो. म्हणून ही तातडीने बैठक बोलावली असं ही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला उद्धसना जिल्हाप्रमुख संजय पवार, सुनील शिंत्रे, विजय देवणे, सुनील मोदी, रवि इंगवले यांच्यासह माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते. त्यामुळे दुधवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जर महाविकास आघाडीच्या दोन्हा जागा उद्धवसेनेच्या वाट्याला आल्यास उमेदवार कोण ? हा देखील उत्सुकतेचा प्रश्न अनेकांना पडला आहे.