पुणे ( प्रतिनिधी ) चित्रकला हा अनेकांचा आवडीचा कलाप्रकार. लहानपणी जडलेला हा छंद भविष्यात अनेकांसाठी करिअर बनतो. त्यातूनच अनेक प्रतिभावंत चित्रकार तयार होतात. अशीच प्रतिभा लाभलेली एक तरुणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भेटली. तिने पाटील यांना एक रेखाचित्र भेट दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, भारती विद्यापीठाची स्वप्नाली बिरुणगी ही तरुणी. काल पुणे पुस्तक महोत्सवाच्या विश्वविक्रम कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भेटली. त्यावेळी कार्यक्रम सुरू असताना स्वप्नालीने माझ्या प्रेमाखातर आपल्या कुंचल्यातून रेखाटलेले रेखाचित्र मला भेट दिले.

तिची ही प्रतिभा पाहून अतिशय आनंद आणि कौतुक वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले. पाटील तिला म्हणाले कि स्वप्नाली तुझी कला अतिशय कौतुकास्पद आहे. तिची अशीच जोपासना कर! तुझ्या या अनोख्या भेटीबद्दल मनापासून आभार !